मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Steven Finn : आता मी हरलो! स्टीव्हन फिनने या कारणामुळे घेतली निवृत्ती, वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का

Steven Finn : आता मी हरलो! स्टीव्हन फिनने या कारणामुळे घेतली निवृत्ती, वर्ल्डकपआधी इंग्लंडला मोठा धक्का

Aug 14, 2023 06:12 PM IST

Steven Finn Retirement : स्टीव्हन फिनने २०१० मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

Steven Finn Retirement
Steven Finn Retirement

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. स्टीव्हन फिनने सोमवारी (१४ऑगस्ट) निवृत्ती जाहीर केली. वास्तविक, स्टीव्हन फिन दुखापतीशी झुंजत होता, ज्यामुळे तो जवळपास १ वर्ष इंग्लंड संघाचा भाग नव्हता. स्टीव्हन फिनने निवृत्तीनंतर सांगितले की, आज मी सर्व फॉरमॅटला अलविदा म्हणत आहे. गेली जवळपास १ वर्ष मी माझ्या शरीरावर काम केले, पण आज मी या आव्हानासमोर हरलो. मात्र, मी क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

स्टीव्हन फिन नेमकं काय म्हणाला?

स्टीव्हन फिनने सांगितले की, मी मिडलसेक्ससाठी २००५ मध्ये खेळायला सुरुवात केली. व्यावसायिक क्रिकेट खेळणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. तो म्हणाला की, माझ्या क्रिकेट कारकिर्दीत चढ-उतार आले, पण माझी खेळाची आवड कायम आहे. स्टीव्हन फिन पुढे म्हणाला की, मी १२५ सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. मी माझ्या देशासाठी ३६ कसोटी सामने खेळलो, हे माझ्यासाठी मोठ्या स्वप्नापेक्षा कमी नाही.

वास्तविक, स्टीव्हन फिनने २०१० मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

स्टीव्हन फिनची कारकीर्द अशी होती

स्टीव्हन फिनने सांगितले की, इंग्लंडशिवाय मी मिडलसेक्स आणि ससेक्सचे प्रतिनिधित्व केले. हे क्षण कायम माझ्या मनात राहतील. स्टीव्हन फिनच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली तर या खेळाडूने ३६ सामन्यांत १२५ विकेट घेतल्या. तर इंग्लंडकडून ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०२ विकेट्स घेतल्या. स्टीव्हन फिन २०१५ च्या विश्वचषकात इंग्लंड संघाचा भाग होता. याशिवाय तीन वेळा अॅशेस जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा तो भाग होता.

टी-२० वर्ल्डकप २०२४