Australian open 2024 : ऑस्ट्रेलियन ओपनचा एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत क्रिकेट आणि टेनिसचे दोन दिग्गज खेळाडू दिसत आहेत. वास्तविक, दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ आणि टेनिस स्टार नोव्हॉक जोकोविच टेनिस कोर्टवर क्रिकेट खेळताना दिसत आहेत.
स्टीव्ह स्मिथ आणि नोव्हाक जोकोविचने टेनिस कोर्टवर फलंदाजी केली. सोबतच स्मिथ येथे टेनिस खेळतानाही दिसला.
स्मिथ टेनिस खेळतानाचा आणि जोकोविच क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ सोशल चांगलेच मीडियावर व्हायरल होत आहेत. जोकोविच स्टीव्ह स्मिथचे टेनिस कौशल्य पाहून चांगलाच हैराण झाला होता.
याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये टेनिस दिग्गज जोकोविच हा स्टीव्ह स्मिथला गोलंदाजी करताना दिसला. जोकोविचच्या गोलंदाजीवर स्मिथने जोरदार फटकेबाजी करत चेंडू स्टँडमध्ये उपस्थित प्रेक्षकांकडे पाठवले.
सोबतच, आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये टेनिस स्टार जोकोविच फलंदाजी करताना दिसत आहे. जोकोविच तीन स्टंपसमोर बॅट घेऊन उभा राहिला, पण त्याला पहिला चेंडू मारता आला नाही. यानंतर, दुसऱ्या चेंडूआधी जोकोविचने त्याचे टेनिस रॅकेट उचलले आणि चेंडू फेकल्यानंतर बॅटऐवजी त्याने रॅकेट उचलले आणि त्यावर शॉट मारला. जोकोविचच्या शॉटने बॉल स्टँडमध्ये गेला.
ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्ध मायदेशात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली. कसोटी मालिकेत स्मिथ ऑस्ट्रेलियाचा भाग होता. या मालिकेत स्मिथने ३ सामन्यांच्या ६ डावात १९४ धावा केल्या . या मालिकेत स्मिथने केवळ १ अर्धशतक झळकावले .