जेव्हा एखादा फलंदाज शतक करतो किंवा अर्धशतक करतो तेव्हा त्याचे खूप कौतुक केले जाते. पण सध्या एक क्रिकेटर चर्चेत आहे, ज्याने २६ चेंडूत फक्त एक धाव केली आणि तीही वनडे क्रिकेटमध्ये. आता तुम्ही विचार करत असाल की २६ चेंडूत १ धाव काढणे ही कौतुकास्पद कामगिरी कशी काय?
होय...नक्कीच. पण हा खेळाडू अशा परिस्थितीत क्रीजवर अडून राहिला जेव्हा त्याच्या संघाला आणि त्याच्या कर्णधाराला त्याची सर्वाधिक गरज होती.
श्रीलंकेचा गोलंदाज ईशान मलिंगा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली. या सामन्यात एकीकडे त्याचा कर्णधार धावा करत होता तर दुसरीकडे हा खेळाडू क्रीजवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत होता. या प्रयत्नामुळे तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. ईशान मलिंगा हा ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने ५५ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या. श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत. संपूर्ण संघ कोलमडून पडला, पण मलिंगाने २६ चेंडूत १ धाव काढून नाबाद राहिला आणि कर्णधार असलंकासोबत अर्धशतकी भागीदारी केली.
श्रीलंकेने १३५ धावांत ८ विकेट गमावल्या होत्या. यानंतर अस्लंका आणि ईशान मलिंगा यांच्यात नवव्या विकेटसाठी ७९ धावांची शानदार भागीदारी झाली. श्रीलंकेचा संघ कठीण परिस्थितीत होता. अशा परिस्थितीत मलिंगाने आपल्या कर्णधाराला साथ दिली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठण्यास मदत केली.
भलेही मलिंगाने ७९ चेंडूत ७९ धावांच्या भागीदारीत एक धाव केली असेल पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याने त्याची विकेट पडू दिली नाही. नववी विकेट म्हणून असलंका २१४ धावांवर बाद झाला आणि याच धावसंख्येवर श्रीलंकेची शेवटची विकेटही पडली.
असलंका आणि मलिंगा यांच्यात १०व्या विकेटसाठी ७९ धावांची भागिदारी झाली. यात असलंकाने ५३ चेंडूत ७७ धावा केल्या. असलंकाने सामन्यता १२६ चेंडूत १२७ धावांची खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून एकूण १४ चौकार आणि ५ षटकार आले. त्याच्याशिवाय श्रीलंकेचे सर्व फलंदाज फ्लॉप ठरले.
ऑस्ट्रेलियासमोर केवळ २१५ धावांचे लक्ष्य होते, परंतु श्रीलंकेने तुफानी गोलंदाजी करत ४९ धावांनी सामना सामना. ऑस्ट्रेलियाचा संघ केवळ ३३.५ षटकांपर्यंत गारद झाला. त्यांना केवळ १६५ धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची स्क्रिप्ट श्रीलंकेचे कर्णधार चारिथ असलंका आणि महिष थिक्षना यांनी लिहिली. असलंकाच्या शतकानंतर महिष थीक्षानाने ४ विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या