SL vs SA Weather Report : टी-20 विश्वचषक २०२४ चा चौथा सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघ सोमवारी (३ जून) भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आपल्या टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करतील. या स्टेडियममधील हा पहिलाच अधिकृत सामना असेल. याआधी येथे सराव सामना खेळला गेला आहे.
श्रीलंकेने एकदाच T20 विश्वचषक जिंकला आहे. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा आहे. दोन्ही संघांना बांगलादेश, नेपाळ आणि नेदरलँड्ससह ड गटात ठेवण्यात आले आहे.
नासाऊ काउंटी स्टेडियमवर ड्रॉप इन पीचचा वापर केला जात आहे. ही पीच ऑस्ट्रेलियात बनलेली आहे. या पीचवर २०० धावांचा टप्प गाठणे कठीण आहे. येथे प्रथम फलंदाजी करणे हा कदाचित चांगला निर्णय असेल. या पीचवर स्पंजी बाउंस फलंदाजांच्या मनात अनिश्चितता आणेल आणि त्यामुळे धावसंख्येवरही परिणाम होईल. पण दुसऱ्या डावात धावा काढणे येथे खूप कठीण असेल, हे सराव सामन्यात दिसून आले. येथील आउटफिल्डही संथ आहे, यामुळे फलंदाजांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे येथे लो स्कोअरिंग रोमांचक सामना होऊ शकतो.
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. हवामान आल्हाददायक असेल. तापमान सुमारे २५ अंश असेल. पावसाची शक्यता आहे, पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही. एकूणच हवामानाची परिस्थिती खेळासाठी चांगली दिसते.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, रायन रिकेल्टन, एडन मार्कराम (कर्णधार), डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी.
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस, कामिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा, चारिथ असलंका, वानिंदू हसरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश थेक्षाना, मथिशा पाथिराना, दिलशान मदुशंका.
संबंधित बातम्या