श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा सलामीवीर आणि विकेटकीपर फलंदाज कुसल मेंडिस याने शानदार शतकी खेळी केली आहे.
मेंंडिस ११५ चेंडूत १०१ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार लगावले. हे वृत्त लिहिपर्यंत श्रीलंकेने ४५ षटकात २१५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेने पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. हा दुसरा आणि शेवटचा सामना आहे.
तत्पूर्वी या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंका याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यानंत श्रीलंकेने सावध सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. त्यांचा सलामीवीर पाथूम निसंका अवघ्या ६ धावा करून बाद झाला. श्रीलंकेला पहिला धक्का ५व्या षटकात १५ धावांवर बसला.
यानंतर दुसला सलामीवीर कुसल मेंडिस आणि तिसऱ्या नंबरवर आलेल्या निशान मधुशंका यांनी ९८ धावांची भागिदारी केली आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. मधुशंका ७० चेंडूत ५१ धावा करून बाद झाला. यानंतर आलेला कामिंदू मेंडिसला मोठी खेळी खेळता आली नाही. तो स्वस्तात बाद झाला.
पाचव्या क्रमांकावर आलेल्या चरिथ असलंकाने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने कुसल मेंडिसला चांगली साथ दिली आणि संघाला २०० धावांच्या पार पोहोचवले.
श्रीलंका- पथुम निसांका, निशान मदुष्का, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, एशान मलिंगा, असिथा फर्नांडो.
ऑस्ट्रेलिया- मॅथ्यू शॉर्ट, ट्रॅव्हिस हेड, जेक फ्रेझर-मॅकगर्क, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), जोश इंग्लिस (विकेटकीपर), आरोन हार्डी, ग्लेन मॅक्सवेल, सीन ॲबॉट, बेन द्वारशुइस, ॲडम झाम्पा, तन्वीर संघा
संबंधित बातम्या