श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा संघ अप्रतिम फॉर्ममध्ये दिसला आहे. या काळात श्रीलंकेने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
या सामन्यात श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावून ६०२ धावांचा डोंगर उभारला आणि त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत न्यूझीलंडला ८८ धावांत ऑलआउट केले.
त्यामुळे न्यूझीलंडला फॉलोऑनला सामोरे जावे लागले आणि श्रीलंकेकडे ५१४ धावांची आघाडी आली. यासोबतच कसोटी क्रिकेटमधली ही तिसरी मोठी आघाडी आहे, ज्यात विरोधी संघाला फॉलोऑन देण्यात आला आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी लीड आहे, ज्यात विरोधी संघाला फॉलोऑनला सामोरे जावे लागले आहे.
आता इथून हा सामना जिंकणे न्यूझीलंड क्रिकेटसाठी खूप कठीण दिसत आहे. याआधी २००२ मध्येही न्यूझीलंड संघासोबत असाच काहीसा प्रकार घडला होता.
जेव्हा न्यूझीलंडच्या संघाला पाकिस्तानने ५७० धावांची आघाडी घेऊन फॉलोऑन दिला होता. यासह, न्यूझीलंड संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला संघ बनला आहे, ज्याला प्रतिस्पर्धी संघाने ५००+ धावांची आघाडी मिळवून दोनदा फॉलोऑन दिला आहे. दरम्यान, असा खराब फॉर्म न्यूझीलंड क्रिकेटसाठी चिंतेचा विषय आहे.
७०२ धावा - इंग्लंड (९०३/७) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१) - ओव्हल, १९३८
५७० धावा - पाकिस्तान (६४३) विरुद्ध न्यूझीलंड (७३) - लाहोर, २००२
५१४ धावा - श्रीलंका (६०२/५) विरुद्ध न्यूझीलंड (८८) - गॅले, २०२४
५०४ धावा - ऑस्ट्रेलिया (६४५) विरुद्ध इंग्लंड (१४१) - ब्रिस्बेन, १९४६
४९६ धावा - ऑस्ट्रेलिया (७३५/६) वि झिम्बाब्वे (२३९) - WACA पर्थ, २००३
फॉलोऑनसह सर्वात मोठी आघाडी मिळवण्याचा विक्रम अजूनही ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्यांनी ७०२ धावांची आघाडी मिळवून ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला होता. हा विक्रम ८६ वर्षांपूर्वी घडला होता. १९३८ मध्ये ओव्हलवर झालेल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने ९०३ धावा केल्या होत्या, त्यानंतर ऑस्ट्रेलिया २०१ धावांवर बाद झाला होता आणि त्यांना फॉलोऑन खेळावा लागला होता.