Dilshan Madushanka IPL 2024 : आयपीएल २०२४ चा थरार २२ मार्चपासून रंगणार आहे. म्हणजेच या स्पर्धेला आता एका आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. अशातच मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका याला गंभीर दुखापत झाली आहे.
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत त्याला ही दुखातपत झाली असून तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.
दिलशान मदुशंकाला आयपीएलच्या मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने ४.६० कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. पण आता त्याच्या आयपीएल २०२४ मध्ये खेळण्याबाबत साशंकता आहे.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मधुशंकाबाबत माहिती शेअर केली आहे. मात्र, आतापर्यंत मुंबई इंडियन्स किंवा आयपीएलकडून मधुशंकाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
वास्तविक, बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यादरम्यान मधुशंकाला दुखापत झाली. त्याचे स्नायू ताणले गेले होते. त्यामुळे मदुशंकाला सामना संपण्यापूर्वीच मैदान सोडावे लागले. आता श्रीलंका क्रिकेटने त्याच्याविषयी माहिती शेअर केली आहे. श्रीलंका क्रिकेटने ट्विटरवर दिलशान मदुशंका दुखापतीमुळे मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही, असे लिहिले आहे."
मधुशंकाची दुखापत हा मुंबई इंडियन्ससाठी मोठा धक्का आहे. तो फॉर्मात होता आणि त्याने अनेकदा घातक गोलंदाजी केली होती. मधुशंकाची बेस प्राइस ५० लाख रुपये होती. पण मुंबई इंडियन्सने त्याला ४.६० कोटी रुपयांना खरेदी केले.
विशेष म्हणजे मधुशंकाचे हे आयपीएलचे डेब्यू सीझन असणार होते. पण आता खेळण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इंडियन प्रीमियर लीग किंवा मुंबई इंडियन्सकडून अद्याप मधुशंकाबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
मधुशंकाच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर ती दमदार आहे. त्याने १४ टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४ विकेट घेतल्या आहेत. तसेच, मधुशंकाने २३ एकदिवसीय सामन्यात ४१ विकेट घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या