श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना खूपच रोमहर्षक झाला. या सामन्यात श्रीलंकेने थोडक्यात बाजी मारली. हा सामना गॉल येथे खेळला गेला.
रचिन रवींद्रच्या शानदार खेळीनंतरही किवी संघाला ६३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. रचिन रवींद्रने १६८ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि १ षटकार मारला. प्रभात जयसूर्याने रचिन रवींद्रला आपला शिकार बनवले.
वास्तविक, न्यूझीलंडसमोर विजयासाठी २७५ धावांचे लक्ष्य होते, परंतु किवी संघ केवळ २११ धावांवरच मर्यादित राहिला.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने आज पाचव्या दिवशी (२३ सप्टेंबर) ८ बाद २०७ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. न्यूझीलंडला ६८ धावा करायच्या होत्या आणि त्यांचे दोन फलंदाज शिल्लक होते. मात्र चौथ्या दिवसाचा नाबाद फलंदाज रचीन रवींद्र फार काळ टिकू शकला नाही. रचिन रवींद्रला आज त्याच्या धावसंख्येत केवळ १ धाव जोडता आली. प्रभात जयसूर्याने या खेळाडूला आपला बळी बनवले. त्याचवेळी न्यूझीलंडचा शेवटचा फलंदाज विल्यम ओरूरकी ६ चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला.
विल्यम ओरुकला प्रभात जयसूर्याने बाद केले. अशाप्रकारे चौथ्या दिवशीच्या धावसंख्येत अवघ्या ४ धावांची भर घालत किवी संघ सर्वबाद झाला.
श्रीलंकेसाठी प्रभात जयसूर्या सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. प्रभात जयसूर्याने ६८ धावांत ५ बळी घेतले. रमेश मेंडिसला ३ विकेट मिळाले. याशिवाय असिथा फर्नांडो आणि धनंजय डी सिल्वा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
श्रीलंकेने पहिल्या डावात ३०५ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४० धावा केल्या. अशा प्रकारे किवी संघाला ३५ धावांची आघाडी मिळाली होती. याला उत्तर देताना श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३०९ धावा केल्या.