मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs RR Weather Report : क्वालिफायर २ मध्ये हैदराबाद-राजस्थान भिडणार, सामना झाला नाही तर हा संघ फायनलमध्ये जाणार

SRH vs RR Weather Report : क्वालिफायर २ मध्ये हैदराबाद-राजस्थान भिडणार, सामना झाला नाही तर हा संघ फायनलमध्ये जाणार

May 24, 2024 10:44 AM IST

SRH vs RR Qualifier 2 : मोसमातील उर्वरित दोन्ही सामने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत, त्यामुळे क्वालिफायर २ सामन्यादरम्यान तेथे हवामान कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आतापर्यंत या मोसमातील तीन सामने पावसामुळे वाहून गेले आहेत.

SRH vs RR Weather Report : क्वालिफायर २ मध्ये हैदराबाद-राजस्थान भिडणार, सामना झाला नाही तर हा संघ फायनलमध्ये जाणार
SRH vs RR Weather Report : क्वालिफायर २ मध्ये हैदराबाद-राजस्थान भिडणार, सामना झाला नाही तर हा संघ फायनलमध्ये जाणार

SRH vs RR Qualifier 2, IPL 2024 : आयपीएल २०२४ चा दुसरा क्वालिफायर सामना आज (२४ मे)  चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघ आमनेसामने येणार आहेत. हैदराबादला या मोसमातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते, तर राजस्थान संघाने एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा पराभव करून क्वालिफायर २ मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

आता या मोसमातील उर्वरित दोन्ही सामने चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत, त्यामुळे क्वालिफायर २ सामन्यादरम्यान तेथे हवामान कसे असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आतापर्यंत या मोसमातील तीन सामने पावसामुळे वाहून गेले आहेत. 

दक्षिण भारतात पाऊस, चेन्नईतचं हवामान कसं असेल?

 सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील क्वालिफायर २ सामना चेन्नईत खेळला जाणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय हवामान विभागाच्या मते, दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे परंतु चेन्नईमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत चेन्नईत होणाऱ्या या महत्त्वाच्या सामन्यात काही वेळ पावसाने व्यत्यय येऊ शकतो. पण सामना पूर्ण होऊ शकतो.

सामन्यादरम्यान ढग जमा होऊ शकतात, त्यामुळे सामन्यादरम्यान दव पडण्याची शक्यता कमी होऊ शकते. तपमानाबद्दल बोलायचे तर कमाल ३६  अंशांच्या आसपास असू शकते तर किमान तापमान २९ अंश सेल्सिअसच्या आसपास असू शकते. वाऱ्याचा वेग ताशी १९  किलोमीटर इतका असू शकतो.

पाऊस आला तर फायदा कोणत्या संघाला?

२४ मे रोजी होणारा क्वालिफायर 2 सामना पावसामुळे रद्द झाला, तर त्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे, अशा परिस्थितीत, जर दोन्ही दिवशी सामना पूर्ण झाला नाही, तर अशा परिस्थितीत सनरायझर्स संघ हैदराबाद थेट अंतिम फेरीत पोहोचेल. खरं तर, आयपीएलच्या १७ व्या मोसमातील लीग टप्पा संपल्यानंतर, सनरायझर्स हैदराबाद संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होता, तर राजस्थानचा संघ तिसऱ्या स्थानावर होता. त्यामुळे पावसामुळे सामना रद्द झाल्यास हैदराबाद थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल.

टी-२० वर्ल्डकप २०२४