मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Vs RR : शाहबाज-अभिषेकसमोर राजस्थानचे फलंदाज फेल, सनरायझर्स हैदराबाद फायनलमध्ये

SRH Vs RR : शाहबाज-अभिषेकसमोर राजस्थानचे फलंदाज फेल, सनरायझर्स हैदराबाद फायनलमध्ये

May 24, 2024 06:57 PM IST

SRH Vs RR IPL Score Qualifier 2nd : आयपीएल २०२४ चा क्वालिफायर-२ सामना आज सनरायझर्स हैदराबादचा आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. या सामन्याचा लाईव्ह स्कोअर येथे पाहा.

Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals Match Scorecard
Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals Match Scorecard (PTI)

आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर-२ मध्ये, आज (२४ मे) सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी झाला. या सामन्यात सनराझर्स हैदराबादने राजस्थानचा ३६ धावांनी पराभव करत आयपीएलच्या फायनलमध्ये एन्ट्री केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात राजस्थानसमोर विजयासाठी १७६ धावांचे लक्ष्य होते, पण ते ७ विकेट्सवर १३९ धावाच करू शकले. आता २६ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात सनरायझर्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्सशी (KKR) होणार आहे. कोलकाताने पहिल्या क्वालिफायरमध्ये हैदराबादचा पराभव करूनच अंतिम फेरी गाठली होती.

राजस्थान वि. हैदराबाद क्रिकेट स्कोअर

राजस्थानचा निम्मा संघ गारद

इम्पॅक्ट प्लेयर शाहबाज अहमदने शानदार गोलंदाजी करत राजस्थानचा डाव उद्ध्वस्त केला. शाहबाजने अश्विनला शुन्यावर बाद केले. राजस्थानने ७९ धावांत ५ विकेट गमावल्या आहेत. या सामन्यातील शाहबाजची ही तिसरी विकेट आहे. राजस्थानने चहलच्या जागी शिमरॉन हेटमायरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून मैदानात उतरवले आहे.

राजस्थानला दुसरा धक्का

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या शाहबाज अहमदने जबरदस्त फॉर्मात दिसत असलेल्या यशस्वी जैस्वालला बाद करून हैदराबादला दुसरे यश मिळवून दिले. यशस्वी २१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. यशस्वी अर्धशतकाकडे वाटचाल करत होता, पण शाहबाजने त्याचा डाव संपवला.

सनरायझर्स हैदराबादच्या १७६ धावा

आयपीएल २०२४ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात सनरायझर्स हैदराबादने २० षटकात ९ गडी गमावून १७५ धावा केल्या. हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने सर्वाधिक ५० धावा केल्या. तर राहुल त्रिपाठीने ३७ धावांची तर ट्रॅव्हिस हेडने ३४ धावांची खेळी केली. हैदराबादने पुन्हा एकदा झंझावाती सुरुवात केली, पण ठराविक अंतराने विकेट गमावल्यामुळे मोठी धावसंख्या होऊ शकली नाही.

हेनरिक क्लासेनचे दमदार अर्धशतक

हेनरिक क्लासेनने ३३ चेंडूत ४ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. या मोसमातील त्याचे हे चौथे अर्धशतक आहे. यासह शाहबाज अहमद १४ चेंडूत एका षटकारासह १७ धावांवर खेळत आहे. १८ षटकांत संघाची धावसंख्या ६ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा झाली आहे.

पॉवरप्लेमध्ये ठोकल्या ६८ धावा

६ षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या ३ गड्यांच्या मोबदल्यात ६८ धावा आहे. ट्रॅव्हिस हेड १३ चेंडूंत दोन चौकारांसह १६ धावांवर खेळत आहे. तसेच क्लासेन १ चेंडूत १ धावेवर आहे.

त्रिपाठी बाद

ट्रेंट बोल्टने आपली चमकदार गोलंदाजी सुरू ठेवत फॉर्मात दिसत असलेल्या राहुल त्रिपाठीला बाद करून हैदराबादला दुसरा धक्का दिला. राहुल १५ चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने ३७ धावा करून बाद झाला. आता एडन मार्कराम क्रीझवर आला आहे.

हैदराबादची वादळी सुरुवात

सुरुवातीच्या धक्क्यानंतरही हैदराबादचा धावगतीचा वेग कमी झालेला नाही. अभिषेक बाद झाल्यानंतर नवा फलंदाज म्हणून आलेल्या राहुल त्रिपाठीने वेगवान खेळ करत राजस्थानच्या गोलंदाजांवर दबाव आणला. राहुलच्या शानदार फलंदाजीमुळे हैदराबादने ४ षटकांअखेर एका विकेटच्या मोबदल्यात ४५ धावा केल्या आहेत. राहुल त्रिपाठी १२ चेंडूत २६ धावा करून खेळत आहे, तर ट्रेविड हेड ६  धावांवर क्रीजवर आहे.

२ षटकात २२ धावा

२ षटकांनंतर सनरायझर्स हैदराबादची धावसंख्या एका विकेटवर २२ धावा आहे. अश्विनने दुसरे षटक टाकले आणि त्यात ९ धावा आल्या. ट्रॅव्हिस हेड ४ चेंडूत तीन तर राहुल त्रिपाठी ३ चेंडूत ७ धावांवर खेळत आहेत.

पहिल्या षटकात १३ धावा आणि १ विकेट

ट्रेंट बोल्टने पहिले षटक टाकले. पहिल्या ५ चेंडूत १३ धावा आल्या. यामध्ये अभिषेक शर्माने १ षटकार आणि १ चौकार लगावला. मात्र, सहाव्या चेंडूवर बोल्टने अभिषेक शर्माला झेलबाद केले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, नितीश रेड्डी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

राजस्थानने टॉस जिंकला

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान संघाने क्वालिफायर-२ सामन्यासाठी प्लेइंग-११ मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तर पॅट कमिन्सने संघात एक बदल केला आहे. एडन मार्करमचे प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले आहे.

राजस्थान वि. हैदराबाद पीच रिपोर्ट

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. तसेच, आता आयपीएल शेवटच्या टप्प्यात आणि येथे अनेक सामने खेळले गेले आहेत. अशा स्थितीत खेळपट्टी संथ असणे साहजिक आहे, पण त्यामुळे धावा होणार नाहीत, असे नाही. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६४ धावांची आहे, तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १५१ धावांची आहे.

राजस्थान वि. हैदराबाद हेड टू हेड

SRH आणि RR संघ २०व्यांदा आयपीएलमध्ये आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी राजस्थानने ९ आणि हैदराबादने १० जिंकले आहेत. या मोसमातही हैदराबादने रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा १ धावाने पराभव केला होता. याशिवाय राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील गेल्या ६ सामन्यांमध्ये दोघांनी ३-३ सामने जिंकले आहेत. एकूणच या दोघांमध्ये आतापर्यंत जबरदस्त लढत झाली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४