Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals, 2nd Match : आयपीएल २०२५ चा दुसरा सामना आज (२२ मार्च) रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिमयवर राजस्थानचा कर्णधार रियान पराग याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हैदराबाद प्रथम फलंदाजी करेल.
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद शमी.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी.
राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचे संघ जेव्हा-जेव्हा आमनेसामने आले, तेव्हा सामना थरारक झाला आहे. दोन्ही संघांमध्ये जवळपास बरोबरीची स्पर्धा झाली आहे.
राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत एकूण २० सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये हैदराबादने ११ आणि राजस्थानने ९ सामने जिंकले आहेत. गेल्या मोसमात जेव्हा या दोन संघांमध्ये दोन सामने झाले होते, तेव्हा सनरायझर्स हैदराबादने दोन्ही सामने जिंकले होते.
एकूण सामने: २०
हैदराबाद विजयी : ११
राजस्थान विजयी : ९
आयपीएल २०२५ साठी सनरायझर्स हैदराबाद संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, सचिन बेबी, मोहम्मद शमी, ॲडम झाम्पा, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, राहुल चहर, इशान मलिंगा, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, वियान मुल्डर, नितीशकुमार रेड्डी, अथर्व तायडे, सिमरजीत सिंग, जयदेव उनाडकट, जीशान अन्सारी.
राजस्थान रॉयल्स संघ : रियान पराग (कर्णधार), संजू सॅमसन, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, कुणाल सिंग राठोड, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, फजलहक फारुकी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वेना माफाका, संदीप शर्मा, महिश तिक्ष्णा, युधवीर सिंग.
संबंधित बातम्या