RR vs RCB Dream 11 Prediction : क्वालिफायर २ मध्ये राजस्थान-हैदराबाद आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम-srh vs rr dream 11 prediction qualifier 2 ipl sunrisers hyderabad vs rajasthan royals ipl fantasy cricket tips playing ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  RR vs RCB Dream 11 Prediction : क्वालिफायर २ मध्ये राजस्थान-हैदराबाद आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

RR vs RCB Dream 11 Prediction : क्वालिफायर २ मध्ये राजस्थान-हैदराबाद आमनेसामने, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा परफेक्ट टीम

May 24, 2024 11:08 AM IST

RR vs SRH Dream 11 team Prediction Qualifier 2: Check Fantasy 11 Prediction and details on team, captain, vice-captain, toss and venue analysis for the knockout clash.

SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2 Fantasy 11 Prediction
SRH vs RR, IPL 2024 Qualifier 2 Fantasy 11 Prediction (IPL)

SRH vs RR Qualifier-2 Pitch Report : इंडियन प्रीमियर लीग २०२४ (IPL 2024) च्या शेवटच्या बाद फेरीत म्हणजेच स्पर्धेच्या क्वालिफायर-२ मध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्स सोबत होणार आहे. दोन्ही संघ एकमेकांना भिडण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत.

हैदराबाद संघाला या मोसमातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध ८ गडी राखून एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ४ गडी राखून पराभव करून दुसऱ्या क्वालिफायरसाठी आपले स्थान पक्के केले आहे. दोन्ही संघांमधील हा सामना सायंकाळी ७:३० वाजेपासून चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाईल.

दरम्यान, राजस्थान असो की हैदराबाद, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हन (Dream 11 todays match team prediction) निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल, पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

RR vs SRH Dream 11 Prediction

यष्टिरक्षक - हेनरिक क्लासेन, संजू सॅमसन.

फलंदाज – ट्रॅव्हिस हेड (कर्णधार), अभिषेक शर्मा, यशस्वी जैस्वाल (उपकर्णधार), राहुल त्रिपाठी.

अष्टपैलू - रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नितीश कुमार रेड्डी.

गोलंदाज - युझवेंद्र चहल, पॅट कमिन्स.

राजस्थान वि. हैदराबाद पीच रिपोर्ट

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. तसेच, आता आयपीएल शेवटच्या टप्प्यात आणि येथे अनेक सामने खेळले गेले आहेत. अशा स्थितीत खेळपट्टी संथ असणे साहजिक आहे, पण त्यामुळे धावा होणार नाहीत, असे नाही. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या १६४ धावांची आहे, तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या १५१ धावांची आहे.

राजस्थान वि. हैदराबाद हेड टू हेड

SRH आणि RR संघ २०व्यांदा आयपीएलमध्ये आमनेसामने येणार आहेत. आतापर्यंत झालेल्या १९ सामन्यांपैकी राजस्थानने ९ आणि हैदराबादने १० जिंकले आहेत. या मोसमातही हैदराबादने रोमहर्षक सामन्यात राजस्थानचा १ धावाने पराभव केला होता. याशिवाय राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील गेल्या ६ सामन्यांमध्ये दोघांनी ३-३ सामने जिंकले आहेत. एकूणच या दोघांमध्ये आतापर्यंत जबरदस्त लढत झाली आहे.

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य प्लेइंग इलेव्हन- अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, विजयकांत व्यासकांत.

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेइंग इलेव्हन- यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.