IPL 2024 Cricket Score, SRH vs MI Indian Premier League 2024 : सनरायझर्स हैदराबादने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा ३१ धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या उभारली. त्यांनी २० षटकात ३ गडी गमावून २७७ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा संघ २४६ धावाच करू शकला.
हैदराबादकडून हेन्रिक क्लासेनने ३४ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली. त्याने ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. मार्करामने नाबाद ४२ धावा केल्या. अभिषेक शर्माने ६३ आणि ट्रॅव्हिस हेडने ६२ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने चांगली फलंदाजी केली. त्याने ३४ चेंडूत ६४ धावा केल्या. नमन धीरने ३० धावांचे योगदान दिले. टीम डेव्हिडने नाबाद ४२ धावा केल्या. इशान किशन ३४ धावा करून बाद झाला तर रोहित शर्मा २६ धावा करून बाद झाला.
हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि जयदेव उनाडकट यांनी धारदार गोलंदाजी करताना प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
तिलक वर्मा ३४ चेंडूत ६४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. १५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला आपला बळी बनवले.
तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी दमदार कामगिरी करताना दिसत आहे. त्याने २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. १२ षटकांनंतर संघाची धावसंख्या १६४/३ आहे.
मुंबई इंडियन्सची दुसरी मोठी विकेट पडली. रोहित शर्मा १२ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला. पॅट कमिन्सने रोहितला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मुंबईने ४.४ षटकात ६६ धावा केल्या आहेत.
हैदराबादने दिलेल्या २७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबई इंडियन्सचा डाव सुरू झाला आहे. रोहित शर्मा आणि इशान किशन सलामीला आले आहेत. मुंबईच्या २ षटकात २७ धावा झाल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यांनी मुंबई इंडियन्सला विजयासाठी २७८ धावांचे लक्ष्य दिले आहे. हैदराबादने २० षटकांत ३ गडी गमावून २७७ धावा केल्या. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने नाबाद ८० धावा केल्या. त्याने ३४ चेंडूंचा सामना करताना ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. अभिषेक शर्माने ६३ आणि ट्रॅव्हिस हेडने ६२ धावा केल्या. मार्करामने नाबाद ४२ धावा केल्या.
पियुष चावलाने मुंबईकला मोठा विकेट मिळवून दिला. हैदराबादचा अभिषेक शर्मा स्फोटक खेळीनंतर बाद झाला. त्याने २३ चेंडूत ६३ धावा केल्या. यादरम्यान त्याने ७ षटकार आणि ३ चौकार लगावले. हैदराबादने ११ षटकांत ३ गडी गमावून १६१ धावा केल्या आहेत. आता हेनरिक क्लासेन फलंदाजीसाठी आला आहे.
हैदराबादकडून अभिषेक शर्माने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. तो स्फोटक फलंदाजी करत आहे. अभिषेकने १९ चेंडूत ५४ धावा केल्या आहेत. त्याने ३ चौकार आणि ६ षटकार मारले आहेत. हैदराबादने अवघ्या १० षटकांत २ गडी गमावून १४८ धावा केल्या आहेत.
ट्रॅव्हिस हेड वादळी खेळीनंतर बाद झाला. कोएत्झीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. हेडने २४ चेंडूंचा सामना करत ६२ धावा केल्या. हेडच्या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. आता एडन मार्कराम फलंदाजीला आला आहे. हैदराबादने ८ षटकांत २ गडी गमावून ११७ धावा केल्या आहेत.
ट्रॅव्हिस हेडने मुंबईच्या गोलंदाजांची तुफान धुलाई केली आहे. त्याने १८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो २९० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा करत आहे. अभिषेक शर्मा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला असून तो ३२ धावांवर खेळत आहे. तर हेड ६२ धावांवर खेळत आहे. ७ षटकांनंतर संघाची धावसंख्या १०२ धावा आहे.
सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने हैदराबादला वादळी सुरुवात करून दिली आहे. पण दुसरा सलामीवीर मयंक अग्रवाल स्वस्तात बाद झाला. पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पांड्याने मयंक अग्रवालला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. या सामन्यात अग्रवालला केवळ ११ धावा करता आल्या. त्याचवेळी त्याचा सहकारी फलंदाज ट्रॅव्हिस हेड दमदार कामगिरी करताना दिसत आहे. १६ चेंडूत ४४ धावा करून खेळत आहे. पाच षटकांनंतर संघाची धावसंख्या ५८/१ आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या डावाची सुरुवात झाली आहे. मयंक अग्रवाल आणि ट्रॅव्हिस हेड सलामीला आले आहेत. दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तर, क्वेना मफाका डावातील पहिले षटक टाकत आहे.
सनरायझर्स हैदराबाद : ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (क), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट.
इम्पॅक्ट सब : नि तीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव
मुंबई इंडियन्स : इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, शम्स मुलानी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका.
इम्पॅक्ट सब : डीवाल्ड ब्रेविस, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, विष्णू विनोद, नेहाल वढेरा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हार्दिक पांड्याने सांगितले की, ल्यूक वुड या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये खेळताना दिसणार नाही. तर क्वेना माफाका आज आयपीएलमध्ये पदार्पण करणार आहे.
तर सनरायझर्स हैदराबाद संघात दोन बदल करण्यात आले आहेत. मार्को जॉयान्सेनच्या जागी ट्रेव्हिस हेडचा समावेश करण्यात आला आहे तर टी नटराजन दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या जागी जयदेव उनाडत यांना संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील २००वा सामना खेळताना दिसणार आहे. यावेळी सचिन तेंडुलकरने त्याला २०० क्रमांकाची खास जर्सी भेट दिली आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे.
मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत २१ सामने झाले आहेत. यापैकी १२ सामने मुंबईने तर ९ सामने हैदराबदाने जिंकले आहेत. गेल्या मोसमात म्हणजेच आयपीएल २०२३ मध्ये मुंबईने हैदराबादचा दोन्ही सामन्यात पराभव केला होता.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर या दोघांमध्ये आतापर्यंत ८ सामने झाले आहेत. हैदराबाद आणि मुंबई या दोन्ही संघांनी प्रत्येकी ४ सामने जिंकले आहेत. या दोघांमधील सामन्यात भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक १८ विकेट घेतल्या आहेत. तर जसप्रीत बुमराहने १६ विकेट घेतल्या आहेत.
सनरायझर्स हैदराबाद: मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को यान्सेन/फजलहक फारुकी, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे.
इम्पॅक्ट प्लेयर: टी नटराजन
मुंबई इंडियन्स : इशान किशन, रोहित शर्मा, नमन धीर, डीवॉल्ड ब्रेविस, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पीयूष चल्ला, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट प्लेयर: ल्यूक वुड.
संबंधित बातम्या