मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH vs MI Dream 11 Prediction : हार्दिक-कमिन्स नाही तर या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

SRH vs MI Dream 11 Prediction : हार्दिक-कमिन्स नाही तर या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 27, 2024 09:43 AM IST

SRH vs MI Playing 11 Prediction : आयपीएल २०२४ मध्ये आज मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.

SRH vs MI Playing 11 Prediction हार्दिक-कमिन्स नाही तर या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन
SRH vs MI Playing 11 Prediction हार्दिक-कमिन्स नाही तर या खेळाडूला बनवा कॅप्टन, आज अशी बनवा तुमची ड्रीम इलेव्हन

SRH vs MI Dream 11 Prediction : आयपीएल २०२४ चा आठवा सामना आज बुधवारी (२७ मार्च) सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजेपासून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. यंदाच्या आयपीएलमधील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. 

हैदराबादला त्यांच्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) ४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर मुंबईचा गुजरात टायटन्सकडून (GT) ६ धावांनी पराभव झाला. अशा स्थितीत दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा असणार आहे.

मुंबई असो की हैदराबाद, दोन्ही संघांकडे तगड्या खेळाडूंची फौज आहे. अशा परिस्थितीत या सामन्यासाठी ड्रीम-इलेव्हनसाठी (Dream 11 todays match taam prediction) संघ निवडणे निश्चितच खूप कठीण काम असेल. पण येथे आम्ही तुमची काही प्रमाणात मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

जर तुम्हाला आयपीएलदरम्यान फँटसी क्रिकेट खेळण्याची आवड असेल तर तुम्ही आजच्या सामन्यासाठीचा संघ अशाप्रकारे बनवू शकता.

विकेटकीपर कोण असेल?

यष्टिरक्षक म्हणून इशान किशन आणि हेनरिक क्लासेन हे पर्याय आहेत. इशान हा सलामीवीर आहे आणि हे त्याची सर्वोत्तम बाजू आहे. पॉवरप्लेमध्ये जलद धावा करून ईशान तुम्हाला चांगले गुण मिळवून देऊ शकतो. मात्र, पहिल्याच सामन्यातील क्लॉसेनने जशी वादळी खेळी खेळली, ते पाहून क्लासेनलाही वगळता येणार नाही. जर तुम्हाला सुरक्षित खेळायचे असेल तर दोघांनाही संघात ठेवू शकता. क्लासेन हा एक चांगला पर्याय आहे.

फलंदाजीत या खेळाडूंना निवडा

फलंदाजांची निवड करताना रोहित शर्माला वगळ्याची चूक करू नका. त्याचं कारण म्हणजे सनरायझर्स हैदराबादच्या बॉलिंग लाइनअपविरुद्ध रोहितचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. रोहित व्यतिरिक्त मयंक अग्रवाल हा एक चांगला पर्याय असेल, कारण तो गेल्या सामन्यात जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. तिलक वर्मा यालाही संघात ठेवू शकता. कर्णधारपदासाठी रोहित हा सर्वोत्तम पर्याय असेल.

ऑलराऊंडर्समध्ये हार्दिक पांड्या उत्तम पर्याय

ए़डन मार्कराम आणि हार्दिक पांड्या यांना अष्टपैलू म्हणून निवडू शकता. हार्दिकने गेल्या सामन्यात गोलंदाजीची सुरुवात केली होती. यासोबतच तो तुम्हाला बॅटिंगनेही चांगले गुण देऊ शकतो. मार्करमचा अलीकडचा फॉर्म चांगला आहे. उपकर्णधार म्हणून तुम्ही या दोन खेळाडूंपैकी एकाची निवड करू शकता.

बुमराह आणि कमिन्सला गोलंदाजांमध्ये स्थान देऊ शकता

गोलंदाजीत दोन्ही संघांकडे मजबूत गोलंदाज आहेत. तुम्ही पॅट कमिन्स आणि जसप्रीत बुमराहला कोणत्याही किंमतीत सोडू शकत नाही. कमिन्स तुम्हाला बॅटिंगेही गुण मिळवून देऊ शकतो. त्याचबरोबर बुमराह प्रत्येक सामन्यात जमेल तितक्या लवकर विकेट घेतो. भुवनेश्वर कुमारच्या स्विंगची जादू राजीव गांधी स्टेडियममध्ये नेहमीच पाहायला मिळते. तसेच पियुष चावला मधल्या षटकांमध्ये खूप प्रभावी ठरलो.

ड्रीम इलेव्हन संघ (SRH vs MI Dream 11 team)

यष्टिरक्षक- हेनरिक क्लासेन, इशान किशन

फलंदाज- रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, तिलक वर्मा

अष्टपैलू - ॲडम मार्कराम, हार्दिक पंड्या

गोलंदाज - जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, पियुष चावला.

IPL_Entry_Point