मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SRH Vs KKR : केकेआर आयपीएल २०२४ चा विजेता, फायनलमध्ये हैदराबादचा धुव्वा; कोलकाता तिसऱ्यांदा चॅम्पियन!

SRH Vs KKR : केकेआर आयपीएल २०२४ चा विजेता, फायनलमध्ये हैदराबादचा धुव्वा; कोलकाता तिसऱ्यांदा चॅम्पियन!

May 26, 2024 06:33 PM IST

SRH Vs KKR IPL Final Highlights : आयपीएल २०२४ चा अंतिम सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्य हैदराबाद यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कोलकाताने हैदराबादचा सहज पराभव केला आणि ट्रॉफी जिंकली.

KKR vs SRH IPL Final 2024
KKR vs SRH IPL Final 2024 (AP)

इंडियन प्रीमियर लीग २०२४ ची फायनल आज (२६ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्य हैदराबाद यांच्यात खेळली गेली. दोन्ही संघ चेन्नईच्या चेपॉक क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने होते.

ट्रेंडिंग न्यूज

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. यासह केकेआरने तिसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदाच्या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, केकेआरच्या गोलंदाजांनी त्यांचा निर्णय चुकीचा सिद्ध करत हैदराबादला ११३ धावांत ऑलआऊट केले.

प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सने ११व्या षटकात केवळ २ गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. केकेआरसाठी व्यंकटेश अय्यरने अवघ्या २६ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि ३ षटकार आले. गोलंदाजीत आंद्रे रसेल, मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा हे नायक होते. रसेलने ३ बळी घेतले. तर स्टार्क आणि राणा यांना प्रत्येकी दोन विकेट मिळाले.

केकेआर वि. हैदराबाद क्रिकेट स्कोअर

केकेआरची शानदार सुरुवात

११४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेंकटेश अय्यर आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी कोलकाता नाईट रायडर्सला शानदार सुरुवात करून दिली. केकेआरची धावसंख्या ४ षटकात एका विकेटवर ४६ धावा आहे. व्यंकटेश अय्यर अवघ्या सहा चेंडूत २० धावांवर खेळत आहे. तर रहमानउल्ला गुरबाज १६ चेंडूत १५ धावांवर खेळत आहे.

कोलकाताला पहिला धक्का 

कोलकाताला पहिला धक्का सुनील नरेनच्या रूपाने बसला. त्याला पॅट कमिन्सने शाहबाज अहमदच्या हाती झेलबाद केले. त्याला दोन चेंडूत केवळ ६ धावा करता आल्या. व्यंकटेश अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी रहमानउल्ला गुरबाज क्रीझवर उपस्थित आहे.

हैदराबाद ११३ धावांत गारद

हैदराबादने कोलकातासमोर ११४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात केकेआरने सनरायझर्सला १८ षटकांत ११३ धावांत ऑलआउट केले.

या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो चुकीचा ठरला. या सामन्यात संघाची सुरुवात खूपच खराब झाली. केकेआरच्या गोलंदाजांसमोर केवळ कर्णधार पॅट कमिन्स २४ धावा करू शकला आणि एडन मार्कराम सर्वाधिक २० धावा करू शकला.

या दोघांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. त्यांच्यानंतर हेनरिक क्लासेनने १६ धावा केल्या. तर केकेआर संघाकडून वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलने ३ विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी २-२ विकेट घेतल्या. वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

हैदराबादला पाचवा धक्का

आंद्रे रसेलने हैदराबादला पाचवा धक्का दिला. त्याने ११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एडन मार्करामला बाद केले. त्याला तीन चौकारांच्या मदतीने २० धावा करता आल्या. आता शाहबाज अहमद सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी हेन्रिक क्लासेन (१२) क्रीजवर उपस्थित आहे. ११ षटकांनंतर संघाची धावसंख्या ७०/५ आहे.

हैदराबादला चौथा धक्का

सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षित राणाने बर्थडे बॉय नितीश रेड्डीला विकेटच्या मागे झेलबाद केले. अशाप्रकारे हैदराबादने अवघ्या ४७ धावांवर चौथी विकेट गमावली. आता एडन मार्कराम आणि हेनरिक क्लासेन क्रीजवर आहेत.

ट्रॅव्हिस हेड बाद

हैदराबादची दुसरी विकेट ६ धावांवर पडली. वैभव अरोराने दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला रहमानउल्ला गुरबाजकडे झेलबाद केले. तो शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. एडन मार्कराम चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी राहुल त्रिपाठी उपस्थित आहेत. दोन षटकांनंतर संघाची धावसंख्या ६/२ आहे.

हैदराबादला पहिल्याच षटकात पहिला धक्का

हैदराबादला पहिल्याच षटकात पहिला धक्का बसला. पाचव्या चेंडूवर मिचेल स्टार्कने अभिषेक शर्माला बोल्ड केले. त्याला केवळ दोन धावा करता आल्या. आता राहुल त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. त्याला साथ देण्यासाठी ट्रॅव्हिस हेड क्रीजवर हजर आहे. एका षटकानंतर संघाची धावसंख्या ३/१ आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

अंतिम सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ प्रथम गोलंदाजी करेल. गेल्या सामन्यात येथे दव दिसले नाही. त्यामुळे कमिन्सने प्रथम फलंदाजी निवडली आहे.

या सामन्यात कमिन्सने अब्दुल समदच्या जागी शाहबाज अहमदला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे.

हैद्राबाद वि. कोलकाता हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलच्या इतिहासात सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्स आतापर्यंत २७ वेळा आमनेसामने आले आहेत. या २७ सामन्यांमध्ये केकेआरने १८ वेळा सामना जिंकला आहे, तर SRH फक्त ९ वेळा जिंकू शकला आहे.

चेपॉक पीच रिपोर्ट

कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील अंतिम सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. येथील खेळपट्टी फिरकीपटूंसाठी उपयुक्त आहे. अशा स्थितीत खेळपट्टीच्या बाबतीत केकेआरचा वरचष्मा दिसतो. वास्तविक, दोन्ही संघांच्या फिरकीपटूंवर नजर टाकली तर कोलकाताकडे उत्कृष्ट दर्जाचे फिरकी गोलंदाज आहेत. यामध्ये वरुण चक्रवर्तीने २० आणि सुनील नरेनने १६ विकेट्स घेतल्या आहेत.

दोन्ही संभाव्य प्लेइंग इलेव्हन

कोलकाता नाईट रायडर्सचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन- सुनील नरेन, रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.

इम्पॅक्ट प्लेयर- अनुकुल रॉय/नितीश राणा

सनरायझर्स हैदराबादचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन - ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अब्दुल समद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.

इम्पॅक्ट प्लेयर- शाहबाज अहमद/उमरान म लिक

फायनलसाठी राखीव दिवस

आयपीएल २०२४ च्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. आज पाऊस पडला तर उद्या अंतिम सामना खेळवला जाईल. 

टी-२० वर्ल्डकप २०२४