SA20 : फिरकीपटूंनी टाकल्या संपूर्ण २० ओव्हर्स, जो रूटच्या संघानं केला अनोखा विक्रम, सामनाही जिंकला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA20 : फिरकीपटूंनी टाकल्या संपूर्ण २० ओव्हर्स, जो रूटच्या संघानं केला अनोखा विक्रम, सामनाही जिंकला

SA20 : फिरकीपटूंनी टाकल्या संपूर्ण २० ओव्हर्स, जो रूटच्या संघानं केला अनोखा विक्रम, सामनाही जिंकला

Jan 26, 2025 12:22 PM IST

Paarl Royals vs Pretoria Capitals SA20 : दक्षिणआफ्रिकेच्या SA20 लीगमध्ये एक अनोखा प्रकार घडला आहे. या संघाच्या फिरकीपटूंनी सर्व २० षटके गोलंदाजी केली.

SA20 : फिरकीपटूंनी टाकल्या संपूर्ण २० ओव्हर्स, जो रूटच्या संघानं केला अनोखा विक्रम, सामनाही जिंकला
SA20 : फिरकीपटूंनी टाकल्या संपूर्ण २० ओव्हर्स, जो रूटच्या संघानं केला अनोखा विक्रम, सामनाही जिंकला

Paarl Royals Spinner Bowler All 20 Overs : कोणत्याही क्रिकेट सामन्यात गोलंदाजीची सुरुवात वेगवान गोलंदाजांनी होते. मग चेंडू जुना झाला की फिरकीपटू गोलंदाजीला येतात. विशेषत: दक्षिण आफ्रिकेच्या पीचेसवर तरी असेच घडते. कारण तेथील पीच वेगवान गोलंदाजांना मदत करतात.

पण SA20 या दक्षिण आफ्रिकेच्या लीगमध्ये एक अनोखा प्रकार घडला आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात सर्वच्या सर्व २० षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली आणि संघाने सामनाे जिंकून विश्वविक्रम केला. डेव्हिड मिलर या संघाचा कर्णधार आहे.

भारताचा माजी फलंदाज दिनेश कार्तिक देखील या संघाचा भाग आहे. स्पर्धेतील २० वा सामना पार्ल रॉयल्स आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. सामन्यात पार्ल रॉयल्सच्या फिरकीपटूंनी सर्व २० षटके टाकली. 

टी-20 लीगमध्ये अशी कामगिरी करणारा पार्ल रॉयल्स हा पहिला संघ बनला आहे. या सामन्यात पार्ल रॉयल्सच्या ५ फिरकीपटूंनी संघासाठी ४-४ षटके टाकली, ज्यात जो रूटचाही समावेश होता. रुटने ४ षटकांचा कोटाही पूर्ण केला.

या फिरकीपटूंनी टाकली २० षटके 

पार्ल रॉयल्ससाठी, ब्योर्न फॉर्च्युइन, ड्युनिथ वेल्लालाघे, मुजीब उर रहमान, नाकाबायोमजी पीटर आणि जो रूट यांनी प्रत्येकी ४ षटके टाकली. यादरम्यान फॉर्च्युइन, मुजीब आणि रूट यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय वेल्लालगेला १ विकेट मिळाली. वेल्लालगे याने ४ षटकांत सर्वता कमी १६ धावा दिल्या.

पार्ल रॉयल्स वि. प्रिटोरिया कॅपिटल्स हायलाईट्स

या सामन्यात प्रिटोरिया कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पार्ल रॉयल्सने २० षटकांत १४०/४ धावा केल्या. जो रूटने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ५६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या.

त्यानंतर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या प्रिटोरिया कॅपिटल्सला २० षटकांत ७ बाद १२९ धावांपर्यंतच मजल मारता आली. संघासाठी सलामी देणाऱ्या विल जॅकने ५३  चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या, मात्र त्याची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

Whats_app_banner

संबंधित बातम्या