Southern Superstars vs Konark Surya Odisha : सदर्न सुपरस्टार्स संघाने लेजेंड्स लीग क्रिकेट २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. सदर्न सुपरस्टार्सने अतिशय रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात कोणार्क सूर्या ओडिशाचा पराभव केला. या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला.
श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर गुरुवारी (१६ ऑक्टोबर) कोणार्क सूर्या ओडिशा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर श्रीवत्स गोस्वामी आणि मार्टिन गुप्टिल यांनी सदर्न सुपरस्टार्ससाठी डावाची सुरुवात केली. गोस्वामी एकही धाव न काढता बाद झाला. यानंतर गुप्टिलला मधल्या फळीत हॅमिल्टन मसाकाद्झाची साथ मिळाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. त्यानंतर २५ चेंडूत २७ धावा करून गप्टिल बाद झाला.
मसाकादजा आणि पवन नेगी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. मसाकादजाने ५८ चेंडूत ८३ धावा केल्या तर पवन नेगीने २४ चेंडूत ३३ धावा केल्या.
चतुरंगा डी सिल्वाने ८ चेंडूत ९ धावा केल्या. डावाच्या शेवटी २० षटकांत ६ बाद १६४ धावा केल्या. कोणार्क सूर्या ओडिशाच्या गोलंदाजांमध्ये दिलशान मुनावीरा सर्वात प्रभावी ठरला, त्याने ३ षटकात ९ धावा देत ४ विकेट घेतल्या. दिवेश पठानिया १९ धावात एक तर इरफान पठाणने २२ धावा देत १ एक विकेट घेतली.
सदर्न सुपरस्टारच्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओडिशानकडून रिचर्ड लेवी आणि दिलशान मुनावीरा सलामीला आले. मुनवीराने ९ चेंडूत ११ धावा केल्या तर लेवीने ११ चेंडूत १६ धावांची खेळी खेळली.
केविन ओब्रायनने २४ चेंडूत १७ धावा केल्या. त्यानंतर युसूफ पठाणची जादू या सामन्यात पाहायला मिळाली. त्याने एकट्याने ३८ चेंडूत ८५ धावा करत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. शेवटच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना युसूफला केवळ १ धाव करता आली आणि तो धावबाद झाला.
कोणार्क सूर्या ओडिशाने २० षटकात ९ बाद १६४ धावा केल्या. सदर्न सुपरस्टार्ससाठी, हमीद हसन (२/२८), अब्दूर रज्जाक (२/३१), चतुरंगा डी सिल्वा (२/१९) आणि पवन नेगी (२/३२) यांनी डावात प्रत्येकी २ बळी घेतले.
सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरमध्ये गेला तेव्हा कोणार्क सूर्या ओडिशाने प्रथम फलंदाजी केली. कोणार्क सूर्या ओडिशाकडून युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी फलंदाजी केली. त्यांनी ६ चेंडूत १४ धावा केल्या, ज्यात युसूफचा १ षटकार आणि रिचर्ड लेव्हीच्या एका चौकाराचा समावेश होता.
१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मार्टिन गुप्टिल आणि पवन नेगी दक्षिण सुपरस्टार्ससाठी फलंदाजीला आले. पहिल्या दोन चेंडूंवर सलग २ षटकार मारून गप्टिलने सामना जवळपास संपवला होता. मात्र, तिसऱ्या चेंडूवर दिवेश पठानिया याने गप्टिलची विकेट घेतली. मात्र त्यानंतरही सदर्न सुपरस्टार्सने हे लक्ष्य ५ चेंडूत पूर्ण केले.
संबंधित बातम्या