भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना डरबन येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने आफ्रिकेचा ६१ धावांनी धुव्वा उडवला. भारत आता सलग दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे. दोन्ही संघ आज रविवारी १० नोव्हेंबर) गेकेबेहरा येथे दुसऱ्या T20 सामन्यात आमनेसामने येतील.
संजू सॅमसनच्या शतकामुळे भारताने पहिल्या T20 सामन्यात ६१ धावांनी विजय मिळवत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या T20 मध्ये संजू सॅमसन वगळता इतर फलंदाज धावा करू शकले नाहीत.
त्याच वेळी, पहिल्या T20I मध्ये पावसाची शक्यता होती, परंतु पाऊस आला नाही. आता गाकेबेहरा येथील दुसऱ्या T20 सामन्यातही पावसाची आणि वादळाचीही शक्यता आहे.
Accuweather नुसार, दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या T20I सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. वादळाची ११ टक्के शक्यता आहे. नाणेफेकीच्या वेळी (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता) पावसाची शक्यता ४९ ते ५४ टक्के आहे.
सामन्याच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता ४० टक्क्यांपर्यंत कमी होते. रात्री ८ वाजेपर्यंत पावसाची शक्यता ६३ टक्के आहे. सामना पासामुळे वाहून जाऊ शकत नाही, परंतु पावसामुळे सामन्यात अडथळा येऊ शकतो. तापमान २० अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
गेकेबेहरा येथील सेंट जॉर्ज पार्कची खेळपट्टी संतुलित आहे. येथील खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांसाठी अनुकूल असते, पण जसजसा सामना पुढे सरकतो तशी फिरकीपटूंना मदत मिळू लागते. नाणेफेक जिंकणारे संघ सहसा येथे प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात.
गेकेबेहारामध्ये दक्षिण आफ्रिकेचा रेकॉर्ड चांगला आहे. संघाने ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. गेल्या वर्षी येथे भारताचा पराभव झाला होता. अशा स्थितीत टीम इंडियाला सावध राहण्याची गरज आहे.