SA vs NED Highlights : 'किलर' मिलरमुळे आफ्रिकेचा पराभव टळला, नेदरलँड्सने सामना थोडक्यात गमावला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs NED Highlights : 'किलर' मिलरमुळे आफ्रिकेचा पराभव टळला, नेदरलँड्सने सामना थोडक्यात गमावला

SA vs NED Highlights : 'किलर' मिलरमुळे आफ्रिकेचा पराभव टळला, नेदरलँड्सने सामना थोडक्यात गमावला

Jun 08, 2024 11:41 PM IST

sa vs ned t20 world cup 2024 highlights : ममममदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ॲडम मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आफ्रिकन गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचा संघ २० षटकात ९ बाद १०३ धावा करू शकला.

sa vs ned t20 world cup 2024 highlights
sa vs ned t20 world cup 2024 highlights (AP)

sa vs ned t20 world cup 2024 highlights scorecard : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा १६वा सामना शनिवारी (९ जून) दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळला गेला. बार्बाडोसच्या केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन येथे झालेल्या या सामन्यात आफ्रिकेने नेदरलँड्सचा ५ विकेट्सनी धुव्वा उडवला.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ॲडम मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आफ्रिकन गोलंदाजांसमोर नेदरलँड्सचा संघ २० षटकात ९ बाद १०३ धावा करू शकला.

नेदरलँडच्या ९ पैकी ८ विकेट आफ्रिकन वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. ओटनील बार्टमनने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. त्याचवेळी मार्को यानसेन आणि एनरिक नॉर्खिया यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने १८.५ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. मिलरने षटकार मारून सामना संपवला. मिलरने ५१ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५९ नाबाद धावा केल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

१२ धावात ४ विकेट पडल्या

त्याआधी १०४ धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेची सुरुवात अतिशय वाईट झाली. एकवेळ दक्षिण आफ्रिकेने १२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. तसेच, आफ्रिकादेखील अपसेटचा बळी ठरेल, असे वाटत होते. मात्र, ट्रिस्टन स्टब्सने डेव्हिड मिलरसह पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. त्यानंतर मिलरने येनसेन आणि केशव महाराज यांच्यासोबत छोट्या भागीदारी रचल्या आणि विजयाकडे नेले.

रीझा हेंड्रिक्सला ३ धावा करता आल्या. त्याचवेळी क्विंटन डी कॉक आणि कर्णधार एडन मार्कराम यांना खातेही उघडता आले नाही. हेन्रिक क्लासेनला ४ धावा करता आल्या. 

स्टब्सने ३७ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३३ धावा केल्या. तर मार्को यानसेनला तीन धावा करता आल्या. मिलर ५९ धावा करून नाबाद राहिला. नेदरलँड्सकडून व्हिव्हियन किंगमा आणि लोगान व्हॅन बीक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर बास डी लीडेला १ विकेट मिळाली.

नेदरलँड्सचा डाव

तत्पूर्वी, नेदरलँड्सकडून सिब्रँड एंजेलब्रेक्टने सर्वाधिक धावा केल्या. सायब्रँड एंजेलब्रेक्टने ४५ चेंडूत ४० धावा केल्या. याशिवाय लोगान वॉन विकने २२ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. मात्र डचच्या बहुतांश फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे नेदरलँडचा संघ केवळ १०३ धावा करू शकला.

नेदरलँडचे फलंदाज ठराविक अंतराने पॅव्हेलियनमध्ये परतत राहिले. अशाप्रकारे डच संघ मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. नेदरलँड्सच्या ६ फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही. १ धावेवर नेदरलँडला पहिला धक्का बसला. यानंतर दुसरा फलंदाज १५ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. डच संघाचे सहा फलंदाज ४८ धावांवर पॅव्हेलियनमध्ये गेले होते.

दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँडला ग्रुप-डी मध्ये स्थान देण्यात आले आहे. आजच्या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ २ सामन्यात ४ गुणांसह अव्वल आहे. त्याचबरोबर नेदरलँडचेही २ सामन्यात २ गुण आहेत. मात्र, डच संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड व्यतिरिक्त ड गटात बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या