SA vs NZ : लाहोरच्या मैदानावर न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs NZ : लाहोरच्या मैदानावर न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

SA vs NZ : लाहोरच्या मैदानावर न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

Published Mar 05, 2025 02:42 PM IST

South Africa vs New Zealand Todays Match : चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सेमी फायनल सामना न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडिमयवर आमनेसामने आहेत.

SA vs NZ : लाहोरच्या मैदानावर न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
SA vs NZ : लाहोरच्या मैदानावर न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

South Africa vs New Zealand, 2nd Semi-Final : चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सेमीफायनल लाहोरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. मात्र, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मिचेल सँटनर याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

न्यूझीलंड - विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन आणि विल्यम ओ'रुर्के.

दक्षिण आफ्रिका- रायन रिकेल्टन, टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, मार्को यानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

 न्यूझीलंडचा कर्णधार काय म्हणाला?

न्यूझीलंडचा कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर म्हणाला की, आम्ही प्रथम फलंदाजी करू. ही पीच चांगली दिसते आणि कोरडीही दिसते. माझ्या देशाचा कर्णधार असल्याचा मला अभिमान आहे, आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल न करता प्रवेश केला आहे.

गेल्या सामन्यात आम्ही चांगला खेळ केला नसला तरी या मैदानावर तिरंगी मालिकेत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो. आम्ही चांगले क्रिकेट खेळून विरोधी संघावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार काय म्हणाला?

त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा म्हणाला की, आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती, पण प्रथम गोलंदाजी करण्याचीही फारशी काळजी नव्हती. आमच्या गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. याशिवाय फलंदाजांना आपली कामगिरी चोख बजावावी लागेल.

मी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतलो आहे, पूर्वीपेक्षा बरे वाटत आहे. फायनल आणि सेमीफायनलमध्ये आमचा रेकॉर्ड चांगला राहिला नाही, पण आम्ही आमच्या चुकांमधून धडा घेतला आहे. आमचा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. आम्ही हा सामना एखाद्या सामान्य सामन्याप्रमाणे घेत आहोत, उपांत्य किंवा अंतिम सामन्याप्रमाणे नाही.

 

Rohit Bibhishan Jetnavare

eMail

Whats_app_banner

संबंधित बातम्या