मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA Vs BAN : बांगलादेशची जबरदस्त गोलंदाजी, आफ्रिकेच्या तगड्या फलंदाजांना ११३ धावांत रोखलं

SA Vs BAN : बांगलादेशची जबरदस्त गोलंदाजी, आफ्रिकेच्या तगड्या फलंदाजांना ११३ धावांत रोखलं

Jun 10, 2024 09:42 PM IST

SA Vs BAN T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा २१ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. ग्रुप डी मधील दोन्ही संघ न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर आमनेसामने आहेत.

South Africa Vs Bangladesh Scorecard T20 World Cup 2024
South Africa Vs Bangladesh Scorecard T20 World Cup 2024 (AP)

South Africa Vs Bangladesh Scorecard : -20 वर्ल्डकप २०२४ चा २१ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

यानंतर आफ्रिकेने निर्धारित २० षटकात ६ बाद ११३ धावा केल्या. बांगलादेशला विजयासाठी २० षटकात ११४ धावा करायच्या आहेत.

प्रथम फलंदाजीस आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारच खराब झाली, पण हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांच्या ७९ धावांच्या भागीदारीने संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. हेनरिक क्लासेनने ४४ चेंडूत ४६ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने २ चौकार आणि ३ षटकार ठोकले. 

दुसरीकडे, डेव्हिड मिलरने ३८ चेंडूत २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पॉवरप्ले ओव्हर्समध्ये बांगलादेशने चांगली गोलंदाजी केली, पण त्यानंतर डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन यांनी वर्चस्व गाजवले. बांगलादेशसाठी, विशेषत: तनझिम हसन शाकिब अत्यंत घातक गोलंदाजी करताना दिसला.

याआधी, दक्षिण आफ्रिकेच्या डावाची सुरुवात खूपच खराब झाली कारण पहिल्याच षटकात रीझा हेंड्रिक्स गोल्डन डकवर बाद झाला. त्याला तंजीम हसन साकिबने बाद केले. यानंतर साकीबने क्विंटन डी कॉक आणि कर्णधार एडन मार्कराम यांचीही विकेट घेतली. डी कॉक १८ धावा करून बाद झाला तर मार्कराम केवळ ४ धावा करून बाद झाला. काही वेळाने ट्रिस्टन स्टब्सही शुन्यावर पायचीत झाला.

अशा स्थितीत संघाने २३ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या. येथून हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी ७९ धावांची भागीदारी केली आणि संघ स्थिर दिसू लागला. १० षटकांत संघाची धावसंख्या ४ गडी गमावून ५७ धावा होती. यानंतर मिलर आणि क्लासेनने पुढील ५ षटकांत ३३ धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लासेनने वेग पकडण्यास सुरुवात केली, मात्र १८व्या षटकात ४६ धावांवर तस्किन अहमदने त्याला क्लीन बोल्ड केले. याच्या ५ चेंडूंनंतर मिलरही रिशाद हुसेनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यानंतर आफ्रिकेला धावा करता आल्या नाहीत आणि केवळ ११३ धावांवर समाधान मानावे लागले.

टी-२० वर्ल्डकप २०२४