मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs AFG Semifinal : राशीदच्या घोडचुकीमुळे फायनल खेळण्याची संधी हुकली, या ५ कारणांमुळे अफगाणिस्तानचा पराभव

SA vs AFG Semifinal : राशीदच्या घोडचुकीमुळे फायनल खेळण्याची संधी हुकली, या ५ कारणांमुळे अफगाणिस्तानचा पराभव

Jun 27, 2024 09:32 AM IST

T20 World Cup 2024 SA vs AFG : दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत दमदार कामगिरी करत अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. आफ्रिकेने पहिल्यांदाच टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.

SA vs AFG : राशीदच्या घोडचुकीमुळे दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये, अफगाणिस्तानच्या पराभवाची एक नाही तर ५ कारणं, जाणून घ्या
SA vs AFG : राशीदच्या घोडचुकीमुळे दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये, अफगाणिस्तानच्या पराभवाची एक नाही तर ५ कारणं, जाणून घ्या (AP)

SA vs AFG, T20 World Cup 2024 SA vs AFG Semifinal: दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वचषक २०२४ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकात ५६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ १ गडी गमावून लक्ष्य गाठले.

दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आफ्रिकेवर सेमी फायनलमध्ये हरण्याचा चोकर्सचा टॅग होता, तो आता त्यांनी पुसून टाकला आहे.

त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर (२७ जून) अफगाणिस्तान-आफ्रिका सेमी फायनल खेळली गेली. आतापर्यंत आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तान संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली आणि अनेक सहज पराभव पत्करावा लागला. 

ट्रेंडिंग न्यूज

५ कारणांमुळे अफगाणिस्तानचा पराभव

सरावाची संधी मिळाली नाही

अफगाणिस्तानला मोठ्या सेमीफायनलपूर्वी सरावाची संधीही मिळाली नाही. अफगाणिस्तानने सोमवारी (२४ जून) सेंट व्हिन्सेंटमध्ये उपांत्य फेरीसाठी पात्रता मिळवली होती. यानंतर मंगळवारी सकाळी त्रिनिदादला जाणाऱ्या त्यांच्या विमानाला ४ तास उशीर झाला. यामुळे त्यांना ना सरावाची संधी मिळाली ना नवीन ठिकाणाच्या वातावारणाणाशी जुळवून घेता आले. 

मिडल ऑर्डर पुन्हा फ्लॉप

T20 विश्वचषक २०२४ मध्ये अफगाणिस्तानच्या फक्त सलामीवीरांनीच संघासाठी धावा केल्या आहेत. पण मधल्या फळीत फलंदाजी ही त्यांची सर्वात मोठी समस्या होती. अजमतुल्ला उमरझाईशिवाय एकाही फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या गाठता आली नाही.

अफगाण खेळाडूंचे लक्ष विचलित झाले

अफगाणिस्तानने सुपर ८ मध्ये बांगलादेशला हरवून उपांत्य फेरी गाठली तेव्हा त्यांनी तुफान जल्लोष साजरा केला. सोशल मीडियापासून सगळीकडे अफगाणिस्तानच्या सेलिब्रेशनच्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, यामुळे अफगाणिस्तान संघाचे लक्ष थोडेसे विचलित झाले.

फॉर्मात असलेले दोन्ही सलामीवीर फ्लॉप

अफगाणिस्तानचे सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांची फलंदाजी संपूर्ण स्पर्धेत जोरदार कामगिरी केली. मात्र उपांत्य फेरीत दोन्ही सलामीवीर पूर्णपणे फ्लॉप ठरले. गुरबाज शून्यावर बाद झाला, तर झद्रानने केवळ २ धावा केल्या. या विश्वचषकात सर्वाधिक धावा (२८१ धावा) करणारा फलंदाज हा रहमानउल्ला गुरबाज आहे.

अवघड पीचवर फलंदाजी करण्याचा निर्णय

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, राशीदचा हा निर्णय सर्वात मोठी चुक ठरली. या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. दक्षिण आफ्रिकेने ५७ धावा काढण्यासाठी जवळपास ९ षटके खेळली यावरूनही याचा अंदाज लावता येतो.

WhatsApp channel