मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Mike Procter Dies: दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू माईक प्रॉक्टर यांचे निधन

Mike Procter Dies: दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू माईक प्रॉक्टर यांचे निधन

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Feb 18, 2024 06:31 AM IST

Mike Procter dies aged 77: दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू माईक प्रॉक्टर यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Mike Procter
Mike Procter

Mike Procter Death: दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आणि प्रशिक्षक माइक प्रॉक्टर यांचे निधन झाले. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, माईक प्रॉक्टर हे वयाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर एका रुग्णालयात शस्त्रक्रिया सुरू होती. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली आणि वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माईक प्रॉक्टर यांची पत्नी मरीनाने दक्षिण आफ्रिकेच्या न्यूज २४ वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान माइक प्रॉक्टर यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अष्टपैलू क्रिकेटर माईक प्रॉक्टर हे दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे पहिले प्रशिक्षक होते. वेगवान गोलंदाज आणि हार्ड हिटिंग बॅट्समन अशी त्यांची ओळख होती. त्यानी आपल्या कारकिर्दीत सात कसोटी सामने खेळले. मात्र, वर्णभेदामुळे दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर म्हणून त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. प्रॉक्टरने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी मॅच रेफरींच्या पॅनेलवरही काम केले आहे. प्रॉक्टरने ४०१ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात ४८ शतके आणि १०९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत ३६.०१ च्या सरासरीने २१ हजार ९३६ धावा केल्या.तसेच त्यांच्या नावावर १ हजार ४१७ विकेट्सची नोंद आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बंदी घालण्यापूर्वी प्रॉक्टरने दक्षिण आफ्रिकेसाठी १९७० मध्ये सात कसोटी सामने खेळले होते. १९६७ ते १९७० दरम्यान खेळलेल्या सातपैकी सहा कसोटी सामने त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकले. त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपण्यापूर्वी त्यांनी सात सामन्यात ४१ विकेट घेतले होते.

Yashasvi Jaiswal : २२ वर्षांचा यशस्वी जैस्वाल नंबर वन, दिग्गज केन विल्यमसनला मागे टाकलं

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू अँड्र्यू सायमंड्सवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल प्रॉक्टरने २००८ मध्ये भारताच्या हरभजन सिंहवर तीन कसोटी सामन्यांची बंदी घातली होती. मात्र, त्यानंतर लगेचच हरभजन सिंहचे संघात पुनरागमन झाले.

IPL_Entry_Point