कोणत्याही क्रिकेटपटूसाठी त्याचे आंतरराष्ट्रीय पदार्पण खूप खास असते. प्रत्येक क्रिकेटपटूला स्वप्नवत पदार्पण करायचे असते. पदार्पणातच अर्धशतक किंवा शतक झळकावणं जसं फलंदाजासाठी संस्मरणीय असतं, त्याचप्रमाणे पदार्पणाच्या सामन्यात गोलंदाजाला विकेट मिळणं हे ऐतिहासिक असतं.
असेच काहीसे दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या कॉर्बिन बॉश याच्यासोबत घडले आहे. कॉर्बिन बॉस वयाच्या ३०व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. कॉर्बिनला सेंच्युरियन येथे पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि त्याने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवली.
खरे तर कॉर्बिन बॉशने कसोटी पदार्पणाच्या पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट घेत इतिहास रचला. अशी कामगिरी करणारा कॉर्बिन बॉश जगातील २५ वा गोलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी अशी कामगिरी करणारा कॉर्बिन हा ५वा गोलंदाज ठरला आहे.
कॉर्बिन बॉसने आपल्या पदार्पणाच्या कसोटीत पाकिस्तानचा सलामीवीर आणि कर्णधार शान मसूदचा बळी घेत करिअरची शानदार सुरुवात केली.
१५व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या कॉर्बिनने शान मसूदला बाद केले. ५८ चेंडू खेळून शान मसूद जवळजवळ पूर्णपणे सेट झाला होता, परंतु कॉर्बिनच्या पहिल्याच चेंडूवर त्याला माघारी जावे लागले. शान मसूद २ चौकारांसह १७ धावा करून बाद झाला.
कार्बिन बॉशने १५ षटकात ६३ धावा देत ४ विकेट घेतल्या. अशाप्रकारे, असे म्हणता येईल की कॉर्बिन हा जगातील अशा गोलंदाजांपैकी एक बनला आहे ज्याने कसोटीत स्वप्नवत पदार्पण केले आहे.
या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानी संघ २११ धावात गारद झाला. त्यांच्याकडून कामरान गुलाम याने सर्वाधिक ५४ धावा केल्या. शान मसूद १७ बाबर आझम ४ मोहम्मद रिजवान २७ हे फलंदाज फ्लॉप झाले. आफ्रिकेकडून डेन पीटरसन याने ६१ धावात ५ विकेट घेतल्या. तर कार्बिन बॉसने ४ फलंदाज बाद केले.
संबंधित बातम्या