मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA Vs BAN Highlights : थरारक! आफ्रिकेनं बागंलादेशला ४ धावांनी हरवलं, शेवटच्या षटकात केशव महाराजनं केला चमत्कार

SA Vs BAN Highlights : थरारक! आफ्रिकेनं बागंलादेशला ४ धावांनी हरवलं, शेवटच्या षटकात केशव महाराजनं केला चमत्कार

Jun 10, 2024 11:42 PM IST

sa vs ban highlights : टी-20 वर्ल्डकप २०२४ मध्ये बांगलादेशचा ४ धावांनी पराभव झाला आहे. शेवटच्या षटकात ११ धावा करायच्या होत्या, पण फिरकीपटू केशव महाराजने या षटकात २ फलंदाज बाद केले आणि केवळ ५ धावा दिल्या.

SA Vs BAN Highlights : थरारक! आफ्रिकेनं बागंलादेशला ४ धावांनी हरवलं, शेवटच्या षटकात केशव महाराजनं केला चमत्कार
SA Vs BAN Highlights : थरारक! आफ्रिकेनं बागंलादेशला ४ धावांनी हरवलं, शेवटच्या षटकात केशव महाराजनं केला चमत्कार (PTI)

SA Vs BAN T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा २१ वा सामना (१० जून) दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यात खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आफ्रिकेने २० षटकांत ६ बाद ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला २० षटकात ७ केवळ १०९ धावाच करता आल्या. बांगलादेशचा ४ धावांनी पराभव झाला.

ट्रेंडिंग न्यूज

दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या ५ षटकांमध्ये अत्यंत धारदार गोलंदाजी केली, ज्यात त्यांनी केवळ ३० धावा दिल्या. 

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघासाठी हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी ७९ धावांची भागीदारी केली. क्लासेनने ४६ आणि मिलरने २९ धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. 

बांगलादेश जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरला तेव्हा संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पण यानंतर तौहिद हृदय आणि महमुदुल्लाह यांच्यात ३३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. बांगलादेशकडून हृदयने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ३४ चेंडूत ३७ धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने केलेल्या तगड्या गोलंदाजीमुळे त्यांचा ४ धावांनी विजय झाला.

११४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशने दुसऱ्याच षटकात तनजीद हसनच्या रूपाने पहिली विकेट गमावली. आफ्रिकेने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये बांगलादेशला केवळ २९ धावा करू दिल्या. 

अशा स्थितीत धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बांगलादेशने ३ विकेट लवकर गमावल्या. त्यामुळे बांगलादेशची अवस्था १० षटकात ४ गडी बाद ५० धावा अशी झाली. यांनतर तौहिद हृदय आणि महमुदुल्लाह यांच्यात चांगली भागीदारी झाली आणि त्यांनी मिळून संघाची धावसंख्या १५ षटकांत ८३ धावांपर्यंत नेली. 

या दरम्यान, १७व्या षटकात महमुदुल्लाहविरुद्ध एलबीडब्ल्यूचे अपील करण्यात आले होते, परंतु डीआरएसनंतर त्याला नाबाद घोषित करण्यात आले. सामना बहुतांशी बांगलादेशच्या ताब्यात होता, मात्र १८व्या षटकात रबाडाने हृदयची विकेट घेत त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि सामना फिरवला. 

शेवटच्या २ षटकात बांगलादेशला विजयासाठी १८ धावांची गरज होती. तर बांगलादेशला शेवटच्या षटकात ११ धावा करायच्या होत्या, तर फिरकी गोलंदाज केशव महाराज गोलंदाजीला होता. या षटकात केवळ ५ झाल्या आणि २ फलंदाज झाले. सेट झालेला महमुदउल्लाह ३ चेंडू नॉन-स्ट्रायकिंग एंडला होता. तो चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा विजय जवळपास निश्चित झाला होता. शेवटच्या चेंडूवर फटका लागला नाही त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामना ४ धावांनी जिंकला.

रबाडाने फिरवला सामना

वास्तविक, बांगलादेशला शेवटच्या ३ षटकात विजयासाठी २० धावांची गरज होती. पण १८व्या षटकात कागिसो रबाडा गोलंदाजी करायला आला, ज्याने षटकाच्या पहिल्या चेंडूवर ३७ धावांवर सेटचा फलंदाज ताहिद हृदयला बाद केले नाही तर संपूर्ण षटकात केवळ २ धावा दिल्या. त्यामुळे बांगलादेशी फलंदाजांवर दबाव आला आणि मोठे फटके खेळण्याच्या नादात बांगलादेशी फलंदाजी दडपणाखाली कोसळली.

 

टी-२० वर्ल्डकप २०२४