मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs SA 2nd Test : सिराजच्या वादळात आफ्रिका गारद, दीड तासात डीन एल्गरच्या संघाचा खेळ संपला

IND vs SA 2nd Test : सिराजच्या वादळात आफ्रिका गारद, दीड तासात डीन एल्गरच्या संघाचा खेळ संपला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 03, 2024 03:41 PM IST

india vs South Africa 2nd Test : दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात अप्रतिम कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक ६ बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.

india vs South Africa 2nd Test
india vs South Africa 2nd Test (AP)

IND vs SA 2nd Test : टीम इंडिया आज (३ जानेवारी) केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळत आहे. या सामन्यात आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांत आटोपला आहे.

या सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आफ्रिकन फलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने पहिल्या डावात ९ षटकात १५ धावा देत ६ बळी घेतले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील आफ्रिकेची ही भारताविरुद्धची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.  

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने नोव्हेंबर २०१५ मध्ये भारताविरुद्ध सर्वात कमी धावसंख्या केली होती. त्यावेळी आफ्रिका नागपूर कसोटीत ७९ धावांत गारद झाला होता.

भारतीय संघ आतापर्यंत केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकू शकलेला नाही. टीम इंडियाने येथे खेळल्या गेलेल्या ६ पैकी ४ कसोटी गमावल्या आहेत, तर इतर दोन कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत भारताला आता इतिहास रचण्याची संधी आहे.

तत्पूर्वी, शेवटची विकेट मुकेश कुमारने घेतली. मुकेशने कागिसो रबाडाला (५) बाद केले. या सामन्यात मुकेश आणि बुमराहने २-२ विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराजने १५ धावांत ६ विकेट घेतल्या.

दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सलामीवीर एडन मार्कराम (२ ), डीन एल्गर (४) धावांवर बाद झाले. यानंतर टोनी डी जॉर्जी (२ धावा), ट्रिस्टन स्टब्स (३), मार्को जॅयानसेन (००), केशव महाराज (१ धावा), कागिसो रबाडा (१ धावा), नांद्रे बर्गर (४) तंबूत परतले.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जोर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरे (यष्टीरक्षक

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi