Sana Ganguly Accident : सौरव गांगुलीच्या मुलीच्या कारचा अपघात, बसची कारला धडक, सना गांगुली थोडक्यात बचावली
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Sana Ganguly Accident : सौरव गांगुलीच्या मुलीच्या कारचा अपघात, बसची कारला धडक, सना गांगुली थोडक्यात बचावली

Sana Ganguly Accident : सौरव गांगुलीच्या मुलीच्या कारचा अपघात, बसची कारला धडक, सना गांगुली थोडक्यात बचावली

Jan 04, 2025 07:52 AM IST

Sourav Ganguly Daughter Accident: सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुलीच्या कारचा शुक्रवारी संध्याकाळी कोलकात्याच्या डायमंड हार्बर रोडवर अपघात झाला, जिथे बसने तिच्या कारला धडक दिली.

Sana Ganguly Accident : सौरव गांगुलीच्या मुलीच्या कारचा अपघात, बसची कारला धडक, सना गांगुली थोडक्यात बचावली
Sana Ganguly Accident : सौरव गांगुलीच्या मुलीच्या कारचा अपघात, बसची कारला धडक, सना गांगुली थोडक्यात बचावली

Sourav Ganguly Daughter Sana Accident : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मुलगी सना गांगुली हिच्या कारचा शुक्रवारी (३ जानेवारी) संध्याकाळी कोलकात्याच्या डायमंड हार्बर रोडवर अपघात झाला.सनाच्या कारला एका बसने धडक दिली. अपघातावेळी सना कारच्या आत होती आणि तिचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. चांगली गोष्ट म्हणजे सना आणि तिचा ड्रायव्हर पूर्णपणे सुरक्षित आहेत.

अपघातानंतर सनाच्या ड्रायव्हरने बसचा पाठलाग केला. पण बस अपघातानंतर वेगाने निघून गेली. साखर बाजाराजवळ बस थांबवण्यात आली. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून बस चालकाला ताब्यात घेतले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बसच्या धडकेने सनाच्या कारचे किरकोळ नुकसान झाले आहे. पोलिसांनी माहिती मिळताच अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला.

अपघाताच्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले की, कोलकाताहून रायचककडे जाणारी बस अचानक सना गांगुलीच्या कारला धडकली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सना ड्रायव्हरच्या सीटच्या शेजारी बसली असल्याने तिला कोणतीही इजा झाली नाही.

कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रार मिळाल्यानंतर, कोलकाता पोलिसांनी तत्काळ कारवाई करत रॅश ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी आरोपी बस चालकाला अटक केली. या घटनेचा तपास सुरू आहे.

सना गांगुली काय करते? 

सना गांगुली ही सौरव गांगुली आणि त्याची पत्नी डोना गांगुली यांची एकुलती एक मुलगी आहे. सनाने तिचे सुरुवातीचे शिक्षण लोरेटो हाऊस, कोलकाता येथून घेतले आणि नंतर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली.

सध्या सना गांगुली लंडनस्थित बुटीक कन्सल्टिंग फर्म INNOVERV मध्ये कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. सनाचा व्यावसायिक अनुभव विविध क्षेत्रात पसरलेला आहे. Enactus नावाच्या संस्थेसोबत तिने पूर्णवेळ काम केले आहे. याशिवाय तिने प्राइसवॉटरहाऊस कूपर्स आणि डेलॉइट सारख्या नामांकित कंपन्यांमध्येही इंटर्नशीप केली आहे.

सना गांगुली सामाजिक विषयांवरही सक्रिय असते. ऑगस्ट २०२४ मध्ये, कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका ज्युनियर डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ तिने कँडल मार्चमध्ये भाग घेतला होता. 

Whats_app_banner