Royal Challengers Bengaluru vs UP Warriorz : महिला प्रीमियर लीगमध्ये सोमवारी (२४ फेब्रुवारी) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि युपी वॉरियर्स आमनेसामने होते. हा सामना खूपच थरारक झाला, याचा निकाल सुवर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये आरसीबीचा पराभव झाला.
या सामन्यात आरसीबी संघाने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना १८० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूपीनेही लक्ष्याचा पाठलाग करताना निर्धारित २० षटकांत १८० धावा केल्या.
यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला आणि येथे आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना हिच्या एका मोठ्या चुकीमुळे संघ जिंकलेला सामना गमावला.
१८० धावांवर सामना बरोबरीत सुटल्यानंतर यूपीचा संघ सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजीसाठी उतरला. आरसीबीसाठी किम गार्थ हिने सुपर ओव्हर टाकली. गार्थचे हे षटक उत्कृष्ट होते आणि तिने केवळ ८ धावा दिल्या.
यानंतर आरसीबीचा संघ पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. आरसीबीसाठी कर्णधार मंधाना आणि रिचा घोष प्रथम फलंदाजीला आले. यूपीसाठी सोफी एक्लेस्टोन गोलंदाजी करायला आली.
एक्लेस्टोनच्या पहिल्या चेंडूवर रिचा घोषला एकही धाव करता आली नाही. दुसऱ्या चेंडूवर सिंगल आला आणि स्ट्राईक स्मृती मानधनाकडे गेली. या चेंडूवर मंधाना काहीच करू शकली नाही आणि तिला एलबीडब्ल्यूही आऊट करण्यात आले. पण त्यानंतर रिव्ह्यूमध्ये ती नाबाद असल्याचे दिसून आले.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा चेंडू देखील डॉट होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवर मंधानाला फक्त एक सिंगल घेता आला. आता आरसीबीला दोन चेंडूत ७ धावांची गरज होती. षटकाच्या ५व्या चेंडूवर रिचाने आणखी एक सिंगल घेतला. यानंतर आरसीबीला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती, पण स्मृती मानधना बीट झाली.
यूपीविरुद्धच्या या सामन्यात एलिस पेरीने आरसीबीसाठी अप्रतिम खेळी खेळली. पेरीने संघासाठी तुफानी फलंदाजी करत ५६ चेंडूत नाबाद ९० धावा केल्या. या खेळीत तिने ९ चौकार आणि ३ षटकार मारले.
प्रत्युत्तरात यूपीची फलंदाजी सामान्य राहिली. संघाने वेळोवेळी आपल्या विकेट्स गमावल्या, परंतु ९व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या सोफी एक्लेस्टोनने अवघ्या १९ चेंडूत ४ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीनेल ३३ धावा करत खेळ पूर्णपणे बदलला आणि यूपीने सामना बरोबरीत आणला.
संबंधित बातम्या