Smriti Mandhana : स्मृती मानधना बनली 'सेंच्युरी क्वीन', मोडला सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम, मिताली राजला मागे टाकलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Smriti Mandhana : स्मृती मानधना बनली 'सेंच्युरी क्वीन', मोडला सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम, मिताली राजला मागे टाकलं

Smriti Mandhana : स्मृती मानधना बनली 'सेंच्युरी क्वीन', मोडला सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम, मिताली राजला मागे टाकलं

Published Oct 29, 2024 11:22 PM IST

Smriti Mandhana Most ODI Centuries Womens Cricket : स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले. तिने शतकांचा नवा विक्रम केला आहे.

Smriti Mandhana : स्मृती मानधना बनली 'सेंच्युरी क्वीन', मोडला सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम, मिताली राजला मागे टाकलं
Smriti Mandhana : स्मृती मानधना बनली 'सेंच्युरी क्वीन', मोडला सर्वाधिक वनडे शतकांचा विक्रम, मिताली राजला मागे टाकलं (X/@BCCIWomen)

टीम इंडियाची क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती आता भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक एकदिवसीय शतके झळकावणारी क्रिकेटपटू बनली आहे. मानधनाने महान फलंदाज मिताली राजला मागे टाकत तिने हा विक्रम केला आहे.

स्मृतीने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १०० धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला मालिका २-१ ने जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

स्मृती मंधानाचे वनडे कारकिर्दीतील हे आठवे शतक होते. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत आता केवळ ६ खेळाडू तिच्या पुढे आहेत. स्मृतीपूर्वी हा भारतीय विक्रम मिताली राजच्या नावावर होता, जिने आपल्या २३२ वनडे सामन्यांच्या प्रचंड कारकिर्दीत एकूण ७ शतके झळकावली होती.

महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार मेग लॅनिंगच्या नावावर आहे. मेन लँनिंगने आपल्या शानदार कारकिर्दीत १५ शतके झळकावली. लॅनिंग २०२३ मध्ये निवृत्त झाली.

स्मृती मानधनाचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० वे शतक होते, तिने ७ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत दोन शतकी खेळी खेळल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाने आतापर्यंत ८८ सामन्यांमध्ये ३,६९० धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तिच्या नावावर ८ शतके आणि २७ अर्धशतके आहेत.

स्मृती मानधना हिचे इतर रेकॉर्ड

स्मृती मानधना याआधी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २००० धावा करणारी खेळाडू ठरली आहे. तिने हा विक्रम ५१ डावात केला असून सर्वात जलद ३००० धावा करण्याचा विक्रमही तिच्याच नावावर आहे.

मानधनाने ७६ डावांमध्ये ३ हजार धावांचा आकडा गाठला होता. आता ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८,००० धावा करण्यापासून केवळ ११३ धावा दूर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू मिताली राज आहे, जिने तिच्या कारकिर्दीत तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण १०,८६८ धावा केल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या