Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे ११ वर्षांनी शतक, मिताली राजच्या स्पेशल क्लबमध्येही केली एन्ट्री
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे ११ वर्षांनी शतक, मिताली राजच्या स्पेशल क्लबमध्येही केली एन्ट्री

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे ११ वर्षांनी शतक, मिताली राजच्या स्पेशल क्लबमध्येही केली एन्ट्री

Updated Jun 16, 2024 06:39 PM IST

Smriti Mandhana First Odi Century In India : भारतीय महिला संघाची फलंदाज स्मृती मानधना हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकावले आहे. भारतात तिचे पहिलेच शतक आहे.

Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे ११ वर्षांनी शतक, मिताली राजच्या स्पेशल क्लबमध्येही केली एन्ट्री
Smriti Mandhana : स्मृती मानधनाचे ११ वर्षांनी शतक, मिताली राजच्या स्पेशल क्लबमध्येही केली एन्ट्री (PTI)

भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेसोबत एकदिवसीय मालिका खेळत आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आज (१६ जून) ही मालिका सुरू झाली आहे. या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने शतक झळकावले.

या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या अव्वल ६ फलंदाजांमध्ये फक्त स्मृती २० पेक्षा जास्त धावा करू शकली.

स्मृती मानधनाचे भारतात पहिले शतक

स्मृती मंधानाने ११६ चेंडूत तिचे सहावे वनडे शतक पूर्ण केले. तिने मायदेशात म्हणजेच भारतात वनडेत पहिल्यांदाच शतक झळकावले आहे. १२७ चेंडूत ११७ धावांची खेळी करून ती पॅव्हेलियनमध्ये परतली. स्मृतीने या खेळीत १२ चौकार आणि १ षटकार लगावला.

दोन वर्षांनंतर तिने वनडेत शतक झळकावले आहे. स्मृतीने शेवटचे शतक २०२२ च्या विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्ध केले होते. त्यानंतर तिने दोनदा ९०चा टप्पा ओलांडला पण तिला शतक करता आले नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावा पूर्ण

या सामन्यात स्मृती मंधानाने तिच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७ हजार धावाही पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारी ती भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू आहे, तिच्या आधी फक्त मिताली राज अशी कामगिरी करू शकली होती.

महिला क्रिकेटमध्ये स्मृतीपूर्वी ५ खेळाडूंनी ७ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. मितालीने सर्वाधिक १०८६८ धावा केल्या आहेत. यानंतर इंग्लंडची शार्लोट एडवर्ड्स, न्यूझीलंडची सुझी बेट्स, वेस्ट इंडिजची स्टॅफनी टेलर आणि ऑस्ट्रेलियाची मेग लॅनिंग यांची नावे येतात.

दक्षिण आफ्रिकेसमोर २६६ धावांचे लक्ष्य

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ८ बाद २६५ धावा केल्या. भारताचा अर्धा संघ ९९ धावांवर गारद झाला होता. यानंतर दीप्ती शर्माने स्मृतीला साथ दिली. दोघींमध्ये ८१ धावांची भागीदारी झाली. यानंतर स्मृती आणि पूजा वस्त्राकर यांनी ५८ धावांची भर घातली. दीप्तीने ४८ चेंडूत ३७ धावांची नाबाद खेळी तर पूजाने ४२ चेंडूत ३१ धावांची नाबाद खेळी खेळली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या