Abhishek Sharma : अभिषेक शर्माने केलं सर्वात वेगवान टी-20 शतक, राजकोटमध्ये ठोकले ११ षटकार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Abhishek Sharma : अभिषेक शर्माने केलं सर्वात वेगवान टी-20 शतक, राजकोटमध्ये ठोकले ११ षटकार

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने केलं सर्वात वेगवान टी-20 शतक, राजकोटमध्ये ठोकले ११ षटकार

Dec 05, 2024 02:04 PM IST

Abhishek Sharma 28 Ball Century : अभिषेक शर्माने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. त्याने 28 चेंडूत शतक झळकावले.

Abhishek Sharma : अभिषेक शर्माने केलं सर्वात वेगवान टी-20 शतक, राजकोटमध्ये ठोकले ११ षटकार
Abhishek Sharma : अभिषेक शर्माने केलं सर्वात वेगवान टी-20 शतक, राजकोटमध्ये ठोकले ११ षटकार

Abhishek Sharma Syed Mushtaq Ali Trophy 2024 : अभिषेक शर्मा याने विश्वविक्रम केला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ च्या सामन्यात त्याने स्फोटक कामगिरी केली आहे. पंजाबकडून खेळताना अभिषेकने अवघ्या २८ चेंडूत शतक झळकावले आहे. त्याने राजकोटमध्ये मेघालयविरुद्ध ११ षटकार ठोकले.

पंजाबचा कर्णधार असलेल्या अभिषेकने २९ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्याने आपल्या डावात ८ चौकार आणि ११ षटकार ठोकले. अभिषेकने अवघ्या २८ चेंडूत शतक पूर्ण करत एक आश्चर्यकारक विक्रम केला. त्याने ऋषभ पंत आणि रोहित शर्मा सारख्या खेळाडूंना मागे टाकले आहे.

२४ वर्षीय अभिषेक सर्वात जलद टी-20 शतक झळकावणारा संयुक्तपणे पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने गुजरातच्या उर्विल पटेल याची बरोबरी केली आहे. उर्विलने नुकतेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उत्तराखंडविरुद्ध २८ चेंडूत शतक झळकावले होते. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत पंत तिसऱ्या तर 'हिटमॅन' रोहित चौथ्या क्रमांकावर आहे. पंतने ३२ तर रोहितने ३५ चेंडूत टी-२० शतक झळकावले आहे.

अभिषेकने फलंदाज सूर्यकुमार यादव याच्याकडून 'सिक्सर किंग'चा किताब हिसकावून घेतला आहे. टी-२० मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अभिषेक नंबर वनवर आला आहे. त्याने २०२४ मध्ये आतापर्यंत ३८ डावात ८७ षटकार मारले आहेत. सूर्याने २०२२ मध्ये ४१ टी-20 डावात ८५ षटकार ठोकले होते. या यादीत पंत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २०१३ मध्ये ३१ डावात ६६ षटकार ठोकले होते.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-२० षटकार मारणारे भारतीय

८७* (३८ डाव) - अभिषेक शर्मा (२०२४)

८५ (४१ डाव) - सूर्यकुमार यादव (२०२२)

७१ (३३ डाव) - सूर्यकुमार यादव (२०२३)

६६ (३१ डाव) - ऋषभ पंत (२०१८)

६३ (४२ डाव) - श्रेयस अय्यर (२०१९)

६० (३२ डाव) – संजू सॅमसन (२०२४)

Whats_app_banner