मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SL Vs SA : आफ्रिकेसमोर श्रीलंका अवघ्या ७७ धावांत गारद, नॉर्खिया-रबाडाची तुफानी गोलंदाजी

SL Vs SA : आफ्रिकेसमोर श्रीलंका अवघ्या ७७ धावांत गारद, नॉर्खिया-रबाडाची तुफानी गोलंदाजी

Jun 03, 2024 09:36 PM IST

SL Vs SA T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक २०२४ चा चौथा सामना आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात श्रीलंकन संघ ७७ धावांवर गारद झाला.

SL Vs SA : आफ्रिकेसमोर श्रीलंका अवघ्या ७७ धावांत गारद, नॉर्खिया-रबाडाची तुफानी गोलंदाजी
SL Vs SA : आफ्रिकेसमोर श्रीलंका अवघ्या ७७ धावांत गारद, नॉर्खिया-रबाडाची तुफानी गोलंदाजी (PTI)

Sri Lanka Vs South Africa Scorecard : टी-20 विश्वचषक २०२४ चा चौथा सामना (३ जून) श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जात आहे. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर श्रीलंकेचा कर्णधार वानिंदू हसरंगाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

पण श्रीलंकेचा हा निर्णय चुकीचा ठरला. आफ्रिकन गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज १९.१ षटकात अवघ्या ७७ धावांवर गारद झाले. आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी ७८ धावा करायच्या आहेत.

श्रीलंकेची टी-२० विश्वचषकातील सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी २०१० मध्ये ब्रिजटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेचा संघ १६.२ षटकांत ८७ धावांत ऑलआऊट झाला होता. मात्र, ही धावसंख्या श्रीलंकेने दुसऱ्या डावात केली होती.

त्याच वेळी, प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेची सर्वात कमी धावसंख्या १०१ धावा आहे, जी त्यांनी २००७ मध्ये केपटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली होती. तसेच, ७७ धावा ही T20 विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या आहे.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. पथुम निसांका ३ धावा करून बाद झाला. यानंतर संपूर्ण फलंदाजीची फळी कोलमडली. ॲनरिक नॉर्खियाने कहर केला आणि कुसल मेंडिस (१९), कामिंडू मेंडिस (११), चरित असालंका (६) आणि अँजेलो मॅथ्यूज (१६) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 

नॉर्खियाने ४ षटकांत केवळ ७ धावा दिल्या आणि ४ बळी घेतले. कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. महाराजने एकाच षटकात दोन्ही विकेट घेतल्या.

त्याने कर्णधार वानिंदू हसरंगा (०) आणि सदिरा समरविक्रमा (०) यांना बाद केले. दासुन शनाका (९) आणि मथिशा पाथिराना (०) यांना रबाडाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर नुवान तुषारा (०) धावबाद झाला. ओटनीएल बार्टमनला एक विकेट मिळाली.

टी-२० वर्ल्डकप २०२४