Siddharth Desai 9 Wickets Ranji Trophy 2024-25 : रणजी करंडक ही भारतीय देशांतर्गत क्रिकेटची प्रमुख स्पर्धा दोन महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाली आहे. रणजी ट्रॉफीची सहाव्या फेरीत आज (२३ जानेवारी) गुजरात आणि उत्तराखंड आमनेसामने आहेत.
या सामन्यात उत्तराखंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडचा संघ ३० षटकांत केवळ १११ धावा करू शकला.
या दरम्यान गुजरात संघाच्या फिरकीपटूने घातक गोलंदाजी करत एकट्याने ९ गडी बाद केले. सिद्धार्थ देसाई असे या गोलंदाजाचे नाव असून तो केवळ २१ वर्षांचा आहे.
सिद्धार्थ देसाईसमोर उत्तराखंड संघाचे फलंदाज जास्तकाळ टिकू शकले नाहीत. उत्तराखंड संघाच्या वतीने अवनीश सुधाने प्रियांशूसह डावाला सुरुवात केली. प्रियांशू खंडुरी १५ चेंडूत ७ धावा करून बाद झाला. त्याचवेळी अवनीशला केवळ ३० धावा करता आल्या. कर्णधार समर्थही शुन्यावर सिद्धार्थचा बळी ठरला.
मयंक मिश्राही वैयक्तिक ५ धावांवर आर्यन देसाईच्या गोलंदाजीवर बाद झाला. अशातच कुणाल, आदित्य, अभय, दीपकही आर्यादेखील सिद्धार्थ देसाईचे बळी ठरले.
सिद्धार्थने सामन्यात १५ षटके टाकली, त्यापैकी ५ मेडन्स होती. यादरम्यान त्याने ३६ धावांत ९ विकेट घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट २.४० होता.
या दरम्यान
केवळ विशालला एक विकेट मिळाली. विशालने ती विकेट घेतली नसती तर सिद्धार्थने त्याच्या नावावर पूर्ण १० विकेट्स घेतल्या असत्या.
सिद्धार्थ देसाईने रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातसाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील ही तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.
९/३६ - सिद्धार्थ देसाई विरुद्ध उत्तराखंड - अहमदाबाद (वर्ष २०२५)
८/३१ - राकेश ध्रुव विरुद्ध राजस्थान - अहमदाबाद (२०१२)
८/४० - चिंतन गजा विरुद्ध राजस्थान - सुरत (वर्ष २०१७)
१०/४९- अंशुल कंबोज (हरियाणा) वि केरळ - रोहतक (वर्ष २०२४)
९/२३- अंकित चव्हाण (मुंबई) विरुद्ध पंजाब - मुंबई (२०१२)
९/३६- सिद्धार्थ देसाई (गुजरात) विरुद्ध उत्तराखंड - अहमदाबाद (वर्ष २०२५)
९/४५ - आशिष झैदी (उत्तर प्रदेश) विरुद्ध विदर्भ - कानपूर (१९९९)
९/५२- आर संजय यादव (मेघालय) विरुद्ध नागालँड - सोविमा (२०१९)
सिद्धार्थने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत ३६ प्रथम श्रेणी आणि २० लिस्ट ए सामने खेळले आहेत. ४८ प्रथम श्रेणी डावांमध्ये गोलंदाजी करताना त्याने २६.२६ च्या सरासरीने १५९ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय लिस्ट ए च्या २० डावांमध्ये सिद्धार्थने ३१.६० च्या सरासरीने २५ विकेट घेतल्या. फलंदाजी करताना त्याने फर्स्ट क्लासमध्ये ४१० आणि लिस्ट ए मध्ये १० धावा केल्या.
संबंधित बातम्या