टीम इंडियाचा युवा स्टार शुभमन गिल याने अनेक प्रसंगी संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. तो सध्या दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये खेळत आहे. गिल २५ आज (८ सप्टेंबर) वर्षांचा झाला आहे. त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त एक नंबर शेअर केला आहे.
या व्हॉट्सॲप नंबरद्वारे चाहते त्याला बोलू शकतात. गुजरात टायटन्सने शुभमनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये गिलने एक नंबर शेअर केला आहे.
वास्तविक गुजरात टायटन्सने X वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात गिल म्हणतोय की, माझ्या वाढदिवसाचा हा महिना आहे. तुम्ही गुजरात टायटन्स व्हॉट्सॲपवर शुभेच्छा पाठवू शकता. मी तुमच्या मेसेजची वाट पाहत आहे.''
जर तुम्हाला शुभमनला मेसेज करायचा असेल तर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये +919512045648हा नंबर सेव्ह करा. त्यानंतर Hi लिहा आणि WhatsApp वर पाठवा. सोबतच व्हिडीओच्या शेवटी क्यूआर कोडही देण्यात आला आहे.
शुभमन गिल हा वनडे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. याशिवाय शुबमन गिल हा कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू आहे.
तसेच, आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे.
शुभमन गिल हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये ७०० धावांचा आकडा पार करणारा फलंदाज आहे. यानंतर शुभमन गिलने सर्वात कमी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १५०० धावा करण्याचाही पराक्रम केला आहे.
शुभमन गिल अंडर १९ वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. त्या विश्वचषकात शुबमन गिल हा टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू होता. याशिवाय शुभमन गिल हा आयपीएल विजेत्या संघाचा भाग आहे.
IPL २०२२ चे विजेतेपद हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने जिंकले होते. शुभमन गिल हा त्या टीमचा भाग होता.
सध्या शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सचा कर्णधारही आहे.