शुभमन गिल गुणी क्रिकेटपटू आहे, पण २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात त्याची निवड झाली नाही. तेव्हा हा मोठा विषय बनला. खरंतर तो टीम इंडियासोबत अमेरिकेत आहे. पण तो रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंना स्टेडियममध्ये सपोर्ट करताना दिसला नाही.
रिंकू सिंग, आवेश खान आणि खलील अहमद यांसारखे इतर राखीव खेळाडू न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान संघाला चीअर करताना दिसले.
अशातच आता, शुभमन गिल आणि आवेश खान ग्रुप स्टेजनंतर भारतात परतणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. भारतीय मुख्य संघातील खेळाडू जर दुखापतग्रस्त झाला तरच राखीव खेळाडूंची वर्ल्डकप संघात एन्ट्री होऊ शकते. पण आता आतील सूत्रांनुसार, शुभमन गिलवर शिस्तभंगाची कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. यातूनच शुभमन गिलला भारतात परत पाठवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
शुभमन गिल अमेरिकेत टीमसोबत अजिबात दिसला नाही. खरं तर, बातमी अशी आहे की तो संघापासून दूर वेळ घालवत होता आणि कदाचित चो त्याच्या साइड बिझनेसमध्ये व्यस्त होता.
तसेच, आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. तो असा, की शुभमन गिलने भारतीय कर्णधार रोहित शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तो आता रोहितला इंस्टाग्रामवर फॉलो करत नाही. टीम इंडिया आणि शुभमन गिल यांच्यात कदाचित सर्वकाही काही ठीक नसल्याचं दिसतंय.
गेल्या एकदिवसीय विश्वचषकात गिलने भारतासाठी चांगली कामगिरी केली होती. मात्र यावेळी त्याला टी-२० विश्वचषकाच्या मुख्य संघात स्थान मिळाले नाही. राखीव खेळाडू म्हणून तो भारतीय संघासोबत अमेरिकेला गेला आहे. मात्र, आता रोहितसोबतच्या मतभेदाचे हे वृत्त कितपत खरे आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२४ वर्षीय शुभमन गिलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत भारतासाठी २५ कसोटी, ४४ एकदिवसीय आणि १४ टी-20 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत १४९२ , एकदिवसीय सामन्यात २२७१ आणि T20 मध्ये ३३५ धावा आहेत.
संबंधित बातम्या