बांगलादेशविरुद्धच्या चेन्नई कसोटीत शुभमन गिलने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. टीम इंडियासाठी गिलचे हे पाचवे कसोटी शतक आहे. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात त्याला विशेष काही करता आले नाही. पण दुसऱ्या डावात दमदार कामगिरी केली. गिलच्या आधी ऋषभ पंतनेही शतक झळकावले.
गिलच्या आधी ऋषभ पंतनेही शतक झळकावले. वृत्त लिहेपर्यंत शुभमन गिलने १६५ चेंडूंचा सामना करत १०६ धावा केल्या होत्या. त्याने १० चौकार आणि ३ षटकार मारले आहेत.
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने दमदार कामगिरी केली. गिलने ऋषभ पंतसोबत शतकी भागीदारीही केली. मात्र यानंतर पंत बाद झाला.
हे वृत्त लिहिपर्यंत दुसऱ्या डावात भारताने ६१ षटकांत ४ गडी गमावून २६३ धावा केल्या होत्या.
गिलने आतापर्यंत १२ आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने कसोटीत ५ शतके झळकावली आहेत. त्याने एकदिवसीय सामन्यात ६ शतके आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक झळकावले आहे.
भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. गिल पहिल्या डावात विशेष काही करू शकला नाही. तो शून्यावर बाद झाला. पण दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले. भारताकडे आतापर्यंत ४९७ धावांची आघाडी घेतली होती.
शुभमन गिलने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. गिल २०२४ मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. शुभमनने या वर्षात ३ शतके झळकावली आहेत. या बाबतीत त्याने रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना मागे टाकले आहे. यशस्वी आणि रोहितने प्रत्येकी २ शतके झळकावली आहेत. त्यामुळे शुभमन त्यांच्या पुढे गेला आहे.