भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ चा चौथा कसोटी सामना आजपासून (२६ डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. या कसोटीला बॉक्सिंग डे टेस्ट असेही म्हणतात. ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सने मेलबर्नमध्ये भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. वास्तविक, स्टार टॉप ऑर्डर बॅट्समन शुभमन गिलला अंतिम ११ मधून वगळण्यात आले. त्यांच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली.
२५ वर्षीय शुभमन गिलसाठी हा ऑस्ट्रेलिया दौरा अजिबात चांगला राहिला नाही. पर्थमधील पहिल्या कसोटीपूर्वी त्याला दुखापत झाल्याने तो खेळू शकला नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत त्याला नक्कीच संधी मिळाली. मात्र त्याला त्या संधीचा फायदा उठवता आला नाही.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ३१ आणि दुसऱ्या डावात २८ धावा करून तो बाद झाला. ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटीत तो केवळ १ धावा काढून बाद झाला. अशा स्थितीत गिलचा खराब फॉर्म आणि संघ संयोजनामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवण्यात आले आहे. कारण त्याच्या जागी टीम इंडियाने प्रॉपर फलंदाज नाही तर एका अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.
संबंधित बातम्या