Shubman Gill Century, India vs England, 3rd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना अहमदाबादच्या नरेंद्र स्टेडियवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल याने शानदार शतक झळकवले आहे. शुभमन गिलच्या वनडे कारकिर्दीतील हे ७ वे शतक आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटीत शतकं झळकावल्यानंतर गिलने आता या मैदानावर एकदिवसीय सामन्यातही शतक झळकावले. हे वृत्त लिहिपर्यंत गिल ९७ चेंडूत १०४ धावांवर खेळत आहे. त्याने १४ चौकार आणि २ षटकार मारले आहेत.
गिलने २०२३ साली अहमदाबादच्या या मैदानावर २ आयपीएल शतके झळकावली होती. यानंतर त्याने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर एक शतक कसोटीत तर एक टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ठोकले होते. यानंतर गिलने आज वनडेत शतक ठोकून इतिहास रचला.
तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय कर्णधार रोहित शर्मा लवकर पॅव्हेलियनमध्ये परतला, पण यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांच्यात ११६ धावांची उत्कृष्ट भागीदारी झाली. विराट कोहली ५५ चेंडूत ५२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, पण शुभमन गिलने दमदार फलंदाजी सुरूच ठेवली.
या शतकानंतर शुभमन गिलच्या नावाचाही एका विशेष यादीत समावेश करण्यात आला आहे. खरं तर, शुभमन गिल अशा फलंदाजांमध्ये सामील झाला आहे, ज्यांनी एका मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमवर कसोटीशिवाय शुभमन गिलने एकदिवसीय आणि टी-20 फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत.
त्याचबरोबर या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फाफ डू प्लेसिसचे नाव समाविष्ट आहे. फाफ डू प्लेसिसने जोहान्सबर्गच्या मैदानावर तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावले आहे. तर डेव्हिड वॉर्नरने ॲडलेड ओव्हलच्या मैदानावर अशी कामगिरी केली आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर कसोटीशिवाय वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. तसेच क्विंटन डी कॉकने सेंच्युरियनमध्ये असा पराक्रम केला आहे.
संबंधित बातम्या