Shubman Gill : शुभमन गिलचं स्पेशल शतक, एक-दोन नव्हे तर अनेक विक्रम मोडले, चेन्नईत प्रिन्सची दमदार फलंदाजी-shubman gill brilliant inning in chennai test vs bangladesh shubman completes 100 international sixes ind vs ban test ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shubman Gill : शुभमन गिलचं स्पेशल शतक, एक-दोन नव्हे तर अनेक विक्रम मोडले, चेन्नईत प्रिन्सची दमदार फलंदाजी

Shubman Gill : शुभमन गिलचं स्पेशल शतक, एक-दोन नव्हे तर अनेक विक्रम मोडले, चेन्नईत प्रिन्सची दमदार फलंदाजी

Sep 21, 2024 12:15 PM IST

आज शुभमन गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले, त्यासोबतच तो एक विशेष शतक पूर्ण करण्यातही यशस्वी ठरला.

Shubman Gill : शुभमन गिलचं स्पेशल शतक, एक-दोन नव्हे तर अनेक विक्रम मोडले, चेन्नईत प्रिन्सची दमदार फलंदाजी
Shubman Gill : शुभमन गिलचं स्पेशल शतक, एक-दोन नव्हे तर अनेक विक्रम मोडले, चेन्नईत प्रिन्सची दमदार फलंदाजी (PTI)

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्याव भारतीय संघाने आपली पकड घट्ट केली आहे. पहिल्या डावात ३७६ धावा केल्यानंतर टीम इंडियाने बांगलादेशला १४९ धावांत गुंडाळले.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (२१ सप्टेंबर) टीम इंडियाचा दुसरा डाव सुरू असून आपली आघाडी आणखी मजबूत केली आहे. लंचपर्यंत भारताने ३ बाद २०५ धावा केल्या आहेत. भारताची आघाडी ४३२ धावांपर्यंत पोहोचली आहे. तर शुभमन गिल ८६ तर ऋषभ पंत ८२ धावांवर खेळत होते.

दरम्यान आज शुभमन गिलने आपले अर्धशतक पूर्ण केले, त्यासोबतच तो एक विशेष शतक पूर्ण करण्यातही यशस्वी ठरला.

भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात ३ बाद ८१ धावांवरून केली. गिलने ३३ धावांवरून तर ऋषभ पंतने १२ धावांवरून डाव पुढे नेला. यानंतर गिलने आपले अर्धशतक सहज पूर्ण केले.

शुभमन गिलचे विशेष शतक

गिलने ३०व्या षटकात २ षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर आणखी एक षटकार मारून आपल्या ५० धावा पूर्ण केल्या. गिलने मारलेल्या दुसऱ्या षटकारासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले खास शतक पूर्ण केले.

गिलचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकार पूर्ण

या षटकारासह गिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १०० षटकार पूर्ण केले आहेत. गिलने वनडेमध्ये ५२ षटकार आणि टी-20 मध्ये २२ षटकार मारले आहेत. आज दोन षटकार मारण्यापूर्वी, गिलच्या कसोटीत २४ षटकार होते जे २६ झाले आणि गिलने षटकारांचे शतक पूर्ण केले.

सलग पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात ५०+ स्कोअर

शुभमन गिल या सामन्याच्या पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला होता. पण त्याने दुसऱ्या डावात शानदार अर्धशतक झळकावले आणि आता तो आपल्या शतकाकडे वेगाने वाटचाल करत आहे.

कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याच्या बॅटमधून ही सलग पाचवी ५०+ धावसंख्या आहे. या डावात गिलने बचाव आणि आक्रमणाचा जबरदस्त मिलाफ दाखवला. चांगल्या चेंडूंना पूर्ण आदर दिला तर वाईट चेंडूंवर दणके दिले.

२०२३ नंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा

या अर्धशतकानंतर शुभमन गिलनेही एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. २०२३ पासून जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानी आहे. गिलने ७६ डावात ३००८ धावा केल्या.

या काळात त्याने ९ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली. त्याच्या मागे श्रीलंकेचा कुसल मेंडिस (२८५१), रोहित शर्मा (भारत), ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया), पथुम निसांका (श्रीलंका), डॅरिल मिशेल (न्यूझीलंड) आहेत.

Whats_app_banner