टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुभमन गिल नेहमीच चर्चेत राहतो. यासोबतच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही सोशल मीडियावर चर्चेत असतो. शुभमनने अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेसोबत एक जाहिरात शूट केली.
गिलने अनन्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. अनन्यानेही हा फोटो शेअर केला आहे. यानंतर थोड्याच वेळात दोघेही ट्रेंडमध्ये आले. यासोबतच रियान परागही ट्रेंडमध्ये आला. या तिघांच्या चाहत्यांनी अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.
खरं तर अनन्या आणि शुभमन एका ॲड शूटसाठी एकत्र आले होते. दोघांनी एका ब्रँडसाठी फोटोशूट केले आहे. गिल आणि अनन्याने त्यांचा एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यानंतर चाहत्यांनी रियान परागबद्दल कमेंट करायला सुरुवात केली. वास्तविक, अनन्या पांडे ही रियान परागची क्रश आहे, अशी अफवा आहे. यानंतर चाहत्यांनी हाच धागा पकडत सोशल मीडियावर रियान परागची मजा घेण्यास सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी रियान परागची सर्च हिस्ट्रीही सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यामध्ये त्याने अनन्या पांडे हॉट फोटोस, असे सर्च केल्याचे दिसले होते.
दरम्यान, आता शुभमन आणि अनन्या यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी रियान पराग आणि गिल दोघांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने X वर लिहिले की, "दुश्मन न करे दोस्त ने जो किया है."
रियान परागचे नाव X वर अनन्यासोबत जोडले जात आहे. मात्र अद्याप यावर रियानच्या बाजूने कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. तो आणि शुभमन गिल दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये खेळण्याची तयारी करत आहेत. ही स्पर्धा ५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.