Shubman Gill Team India : शुभमन गिल सध्या टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. शुभमन गिलसाठी हे वर्ष चांगले राहिले आहे. त्याने वनडे आणि टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.
पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. शुबमनला त्याच्या कसोटी फॉर्ममुळे टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. पण शुभमनने नुकतीच सोशल मीडियावर एक प्रेरणादायी पोस्ट शेअर केली आहे. त्याने गेल्या वर्षी स्वतःसाठी कोणती ध्येयं ठेवली होती आणि त्यातील किती पूर्ण झाली, हे त्याने सांगितले आहे.
खरंतर शुभमनने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्याने एक हाताने लिहिलेला कागद दिसत आहे. या कागदावर त्याने २०२३ या वर्षात त्याला काय काय साध्य करायचे आहे, हे लिहिलेले दिसत आहे.
शुभमनने ३१ डिसेंबर २०२२ रोजी हे टार्गेट लिहिले होते. भारतासाठी सर्वाधिक शतके ठोकण्याचाही त्याच्या गोलमध्ये समावेश होता. विश्वचषक आणि कुटुंबाबाबतही त्याने विशेष प्लॅनिंग केली होती. शुभमनने या वर्षात टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. तसेच, त्याने २०२३ या वर्षातील बरेच गोल साध्य केले आहेत.
शुभमनने या वर्षाच्या शेवटी हा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘बरोबर १ वर्षापूर्वी मी काहीतरी ठरवले होते. आता २०२३ संपणार आहे. हे वर्ष नवीन अनुभव आणि आनंदाने भरलेले होते. खूप काही शिकायलाही मिळालं. ठरल्याप्रमाणे वर्ष संपले नाही. पण मी अभिमानाने सांगू शकतो की मी त्याच्या खूप जवळ गेलो. येणारे वर्ष नवीन संधी आणि आव्हाने घेऊन येईल. मला आशा आहे की २०२४ मध्ये मी माझ्या नव्या लक्ष्याच्या जवळ जाईन’.