भारतीय क्रिकेट संघाचा युवा फलंदाज शुभमन गिल आज (८ सप्टेंबर) त्याचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. शुभमन गिलचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ रोजी झाला होता. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये शुबमन गिलने टीम इंडियासाठी जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या बळावर भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.
यानंतर तो भारतीय संघाचा भाग झाला. शुभमन गिल टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे.
शुबमन गिलने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की शुभमन गिलच्या नावावर अनेक मोठे रेकॉर्ड आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण शुभमन गिलचे काही मोठे रेकॉर्ड बघणार आहोत.
शुभमन गिलच्या नावावर आहेत हे मोठे रेकॉर्ड
शुभमन गिल हा वनडे क्रिकेटच्या इतिहासात द्विशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज आहे. याशिवाय शुबमन गिल हा कसोटी आणि टी-२० फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडू आहे.
तसेच, आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत शुभमन गिल पहिल्या स्थानावर आहे.
शुभमन गिल हा आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये ७०० धावांचा आकडा पार करणारा फलंदाज आहे. यानंतर शुभमन गिलने सर्वात कमी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये १५०० धावा करण्याचाही पराक्रम केला आहे.
शुभमन गिलचा आत्तापर्यंतचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअर
शुभमन गिल अंडर १९ वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. त्या विश्वचषकात शुबमन गिल हा टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू होता. याशिवाय शुभमन गिल हा आयपीएल विजेत्या संघाचा भाग आहे.
IPL २०२२ चे विजेतेपद हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने जिंकले होते. शुभमन गिल हा त्या टीमचा भाग होता.
सध्या शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सचा कर्णधारही आहे.