भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू श्रेयसची खराब कामगिरी सुरूच आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये भारत-डी संघाचा कर्णधार शून्यावर बाद झाला. भारत-अ संघाचा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने श्रेयस अय्यरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
श्रेयस अय्यरला केवळ ७ चेंडूंचा सामना करता आला. या सामन्यादरम्यान श्रेयस अय्यर सनग्लासेस लावून फलंदाजीला आला होता.
या सामन्यात भारत अ संघाने प्रथम फलंदाजी करताना २९० धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना सुरुवातीच्या धक्क्यांमुळे इंडिया-डीचा डाव बॅकफूटवर आला. अथर्व तायडे ४ धावा करून लवकर बाद झाला तर यश दुबे अवघ्या १४ धावा करून बाद झाला. यानंतर संघाला कर्णधार श्रेयस अय्यरकडून मोठ्या अपेक्षा होत्या.
श्रेयस अय्यर या सामन्यात हेल्मेटच्या आतून डार्क चष्मा घालून फलंदाजीला आला होता. मात्र, त्याला आपल्या डावात केवळ ७ चेंडूंचा सामना करता आला आणि शुन्यावर खलील अहमदचा बळी ठरला.
खलील अहमदच्या एका फुल लेंथ चेंडूवर मिडऑनच्या वरून फटका खेळण्याच्या नादात श्रेयस अय्यर झेलबाद झाला. आकिब खानने त्याचा झेल घेतला. अय्यर खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. आता सोशल मीडियावर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे.
श्रेयस अय्यरचा खराब फॉर्म सुरूच आहे. दुलीप ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत त्याला केवळ ६३ धावा करता आल्या. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांतून श्रेयसला वगळण्यात आले होते. नंतर बीसीसीआयनेही त्याला केंद्रीय करारातून काढून टाकले.
बांगलादेश कसोटी मालिकेसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या संघात श्रेयस अय्यरचाही समावेश करण्यात आलेला नाही.
इंडिया ए संघ- प्रथम सिंग, मयंक अग्रवाल (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, शाश्वत रावत, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, प्रसीध कृष्णा, खलील अहमद, आकिब खान.
इंडिया डी संघ - अथर्व तायडे, यश दुबे, श्रेयस अय्यर (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिकी भुई, सरांश जैन, सौरभ कुमार, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, विद्वथ कवेरप्पा.