Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्जने पैशांचा पाऊस पाडला
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्जने पैशांचा पाऊस पाडला

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्जने पैशांचा पाऊस पाडला

Nov 24, 2024 04:34 PM IST

Shreyas Iyer Most Expensive Player : पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपयांना विकत घेऊन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू बनवले आहे.

Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्जने पैशांचा पाऊस पाडला
Shreyas Iyer : श्रेयस अय्यर ठरला आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू, पंजाब किंग्जने पैशांचा पाऊस पाडला (HT_PRINT)

Shreyas Iyer Sold to Punjab Kings IPL 2025 Auction: श्रेयस अय्यर हा आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. अय्यर याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. दिल्ली कॅपिटल्सनेही त्याला विकत घेण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी पंजाबने बाजी मारली.

KKR ला IPL २०२४ चे विजेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर IPL इतिहासातील लिलावात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. पंजाबने श्रेयसला २६.७५ कोटी रुपयांना खरेदी केले. श्रेयसची मूळ किंमत २ कोटी रुपये होती. श्रेयस अय्यरला मिळविण्यासाठी दिल्ली आणि कोलकाता यांच्यात लढत झाली.

या दोघांमध्ये पंजाब किंग्जनेही बोलीत उडी घेतली. यानंतर पंजाब आणि दिल्ली यांच्यात श्रेयस आणि केकेआरला मागे घेण्याची स्पर्धा लागली. श्रेयस लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू तसेच आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

अय्यरने ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रम मोडला, ज्याला कोलकाता नाईट रायडर्सने २६.७५ कोटी रुपयांना अखेर विकत घेतले.

यापूर्वी, इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात महागडा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क होता, ज्याला केकेआरने आयपीएल २०२४ च्या लिलावात २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते. मेगा लिलावात श्रेयस अय्यरसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत लढत झाली.

श्रेयस अय्यरचे आयपीएल करिअर

श्रेयसने आतापर्यंत आयपीएलमध्ये खेळलेल्या ११६ सामन्यांमध्ये १२७.५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना ३१२७ धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये अय्यरच्या नावावर २१ अर्धशतके आहेत.

पंजाबने अर्शदीपसाठी आरटीएमचा वापर केला

पंजाब किंग्सने राईट टू मॅच (RTM) कार्ड वापरून वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला १८ कोटी रुपयांना खरेदी केले. सनरायझर्स हैदराबादने अर्शदीपवर १८ कोटींची बोली लावली होती, पण पंजाबने RTM च्या माध्यमातून अर्शदीपला आपल्या संघात खेचले.

 

Whats_app_banner