Shreyas Iyer Net Worth : मुंबईकर श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती किती? पंजाब किंग्सनं २६.७५ कोटींना खरेदी केलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shreyas Iyer Net Worth : मुंबईकर श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती किती? पंजाब किंग्सनं २६.७५ कोटींना खरेदी केलं

Shreyas Iyer Net Worth : मुंबईकर श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती किती? पंजाब किंग्सनं २६.७५ कोटींना खरेदी केलं

Dec 06, 2024 01:34 PM IST

Shreyas Iyer Birthday : श्रेयस अय्यर याचा जन्म ६ डिसेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला. त्याने १ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याशिवाय अय्यर २०१५ पासून आयपीएल खेळत आहे.

Shreyas Iyer Net Worth : मुंबईकर श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती किती? पंजाब किंग्सनं २६.७५ कोटींना खरेदी केलं
Shreyas Iyer Net Worth : मुंबईकर श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती किती? पंजाब किंग्सनं २६.७५ कोटींना खरेदी केलं

टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि आयपीएल २०२४ मध्ये आपल्या नेतृत्वात कोलकाता नाइट रायडर्सला चॅम्पियन बनवणारा श्रेयस अय्यर आज (६ डिसेंबर) त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे.

श्रेयस अय्यर याचा जन्म ६ डिसेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला. त्याने १ नोव्हेंबर २०१७ रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याशिवाय अय्यर २०१५ पासून आयपीएल खेळत आहे.

श्रेयस अय्यरची एकूण संपत्ती किती?

श्रेयस अय्यर याची एकूण संपत्ती ८० कोटी रुपये आहे. आयपीएल, बीसीसीआयचा वार्षिक करार आणि ब्रँड एंडोर्समेंट हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. 

याशिवाय तो देशांतर्गत क्रिकेटमधूनही पैसे कमावतो. बीसीसीआयकडून अय्यरला वर्षाला ३ कोटी रुपये मिळत होते. मात्र, त्याला २०२४ साठी बीसीसीआयचा वार्षिक करार मिळाला नाही.

अय्यर २०१५ पासून आयपीएलमध्ये

श्रेयस अय्यरला पहिल्यांदा २०१५ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने (२.६ कोटी) करारबद्ध केले होते. यानंतर त्याचा पगार २०१८ पासून ७ कोटी रुपये झाला. आयपीएलए २०२२ पूर्वी झालेल्या मेगा लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने श्रेयस अय्यरला १२.५ कोटी रुपयांना विकत घेतले.

अलीकडेच सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या मेगा लिलावात अय्यर आयपीएलचा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. पंजाब किंग्सने त्याला २६.७५ कोटी रुपयांना करारबद्ध केले.

श्रेयस अय्यरकडे आलीशान गाड्यांचे कलेक्शन

श्रेयस अय्यर याने BoAt, Manyavar आणि Dream11 सारख्या ब्रँडची जाहिरात केली आहे. रिअल इस्टेटमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे. मुंबईतील लोढा वर्ल्ड टॉवरमध्ये त्याचे ११.८५ कोटी रुपयांचे आलिशान घर आहे.

त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात मर्सिडीज-बेंझ G 63 AMG, Lamborghini Huracan आणि Audi S5 यांचा समावेश आहे. त्याचे वडील संतोष अय्यर मर्सिडीज बेंझ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये काम करतात. तर आई रोहिणी अय्यर यांच्याशिवाय त्याच्या कुटुंबात बहीण श्रेष्ठा अय्यर हिचा समावेश आहे.

श्रेयस अय्यरची आयपीएलमधील कामगिरी

श्रेयस अय्यर २०१५ पासून आयपीएल खेळत आहे. त्याने लीगमध्ये आतापर्यंत ११५ सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने ३२.२४ च्या सरासरीने आणि १२७.४८ च्या स्ट्राईक रेटने ३१२७ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये २१ अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, अय्यरला आतापर्यंत एकही शतक झळकावता आलेले नाही. लीगमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या ९६ धावा आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या