मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  BCCI Contract List : इशान किशन-श्रेयस अय्यरला अजित आगरकरांनी हाकलले, जय शाह यांचा मोठा खुलासा

BCCI Contract List : इशान किशन-श्रेयस अय्यरला अजित आगरकरांनी हाकलले, जय शाह यांचा मोठा खुलासा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
May 10, 2024 05:06 PM IST

Jay Shah on Shreyas Iyer and Ishan Kishan : श्रेयस अय्यर आणि ईशान किशन यांना बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीतून कोणी वगळले? याबाबत जय शहा यांनी मोठा खुलासा केला आहे.

इशान किशन-श्रेयस अय्यरला अजित आगरकरांनी हाकलले, जय शाह यांचा मोठा खुलासा
इशान किशन-श्रेयस अय्यरला अजित आगरकरांनी हाकलले, जय शाह यांचा मोठा खुलासा

Shreyas Iyer and Ishan Kishan : आयपीएल २०२४ पूर्वी, बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंसोबतचा केंद्रिय करार जाहीर केला होता. या यादीतून बीसीसीआयने श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना काढून टाकले होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये न खेळल्यामुळे त्यांना ही शिक्षा देण्यात आली होती. 

ट्रेंडिंग न्यूज

सहसा, जेव्हा जेव्हा बीसीसीआय कोणताही निर्णय घेते तेव्हा पहिले बोट बोर्ड सचिव जय शहा यांच्याकडे दाखवले जाते. पण आता जय शाह यांनी मोठा खुलासा केला आहे की, श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना केंद्रीय कराराच्या यादीतून वगळण्यात आपली कोणतीही भूमिका नव्हती. तर हा निर्णय टीम इंडियाचे चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी घेतला होता.

माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, की "तुम्ही सर्व लॉ वाचू शकता. मी फक्त बैठकांचे समन्वयन करतो. असे निर्णय अजित आगरकरांच्या हातात असतात. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना करारातून मुक्त करण्याचा निर्णयही त्यांचाच होता. दोन खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेटला महत्व दिले नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.' माझे काम फक्त निर्णयांची अंमलबजावणी करणे आहे. आता संजू सॅमसनच्या रूपाने एका नव्या खेळाडूचा संघात प्रवेश झाला आहे. हा निर्णयही आगरकरांचाच आहे.

जय शहा यांनी अय्यर आणि किशन यांच्याशी चर्चा केली होती

जेव्हा श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना भारतीय संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर दोघांनी सेंट्रल कराराच्या यादीतूनही वगळण्यात आले तेव्हा जय शहा यांनी दोन्ही खेळाडूंशी चर्चा केली होती. या संदर्भात निवेदन देताना जय शहा म्हणाले, "हो, मी या दोघांशी बोललो. हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्येही आले होते."

इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांनी आयपीएल २०२४ मध्ये चांगली कामगिरी केली आहे. तरीही भारतीय संघात त्यांचे पुनरागमन सध्यातरी दूरच वाटते. टी-20 विश्वचषक संघात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. निवडकर्त्यांनी इशान किशनकडे दुर्लक्ष करून ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवडले. तर श्रेयस अय्यर मधल्या फळीत फलंदाजी करतो, पण मधल्या फळीतील जागा संघात आधीच भरलेली आहे".

IPL_Entry_Point