पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले. शोएबचे हे तिसरे लग्न आहे. या लग्नानंतर शोएब मलिक आणि भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून शोएब आणि सानिया चर्चेत आहेत. सानिया ही शोएब मलिकची दुसरी पत्नी होती.
पण या दरम्यान, आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीगमधील आहे. वास्तविक, PSL च्या एका सामन्यादरम्यान, स्टेडियममधील चाहते शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेदला सानिया मिर्झाचे नाव घेऊन चिडवत असताना दिसत आहेत.
सना जावेद ही PSL सामन्यादरम्यान आपला पती शोएब मलिकाला सपोर्ट करण्यासाठी आली होती, पण चाहत्यांनी तिला पाहून चांगलेच ट्रोल केले. सनाला पाहताच चाहत्यांनी सानिया मिर्झा-सानिया मिर्झा अशी घोषणाबाजी सुरू केली.
सना जावेदला चाहत्यांनी बराच त्रास दिला. यावेळी सनाची रिअॅक्शन पाहण्यासारखी होती. विशेष म्हणजे चाहते आधी सना-सना असे म्हणून तिला हाक मारतात. यानंतर सना चाहत्यांकडे पाहते, तेव्हा चाहते सानिया मिर्झा-सानिया मिर्झा अशा घोषणा देतात. यानंतर सना शांतपणे निघून जाते.
शोएब मलिक PSL मध्ये कराची किंग्सकडून खेळत आहे. त्याने मुल्तान सुल्तान्सविरुद्ध चांगली कामगिरी केली. पण त्याच्या संघाचा पराभव झाला. मलिकने ३५ चेंडूंचा सामना करताना ५३ धावा केल्या. मुलतान सुलतानने हा सामना ५३ धावांनी जिंकला.
शोएब मलिकने नुकतीच सना जावेदला तिसरी पत्नी बनवले आहे. गेल्या महिन्यात २० जानेवारीला शोएबने सनासोबत लग्न करून सर्वांना आश्चर्यच कित केले होते. सनापूर्वी शोएबची दुसरी पत्नी सानिया मिर्झा होती. दोघांनी २०१० मध्ये लग्न केले होते. मात्र १४ वर्षांनंतर त्यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि २०२२ पासून त्यांच्यात घटस्फोटाच्या बातम्या समोर येऊ लागल्या होत्या. मात्र या वर्षी दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.