मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shoaib Malik : शोएबनं सोडली सानिया मिर्झाची साथ; 'या' अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

Shoaib Malik : शोएबनं सोडली सानिया मिर्झाची साथ; 'या' अभिनेत्रीसोबत बांधली लग्नगाठ

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 20, 2024 12:00 PM IST

Shoaib Malik Marries Sana Javed : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे.

Shoaib Malik Marries Sana Javed
Shoaib Malik Marries Sana Javed

Shoaib Malik Marries Sana Javed : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने तिसरे लग्न केले आहे. शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिची जीवनसाथी म्हणून निवड केली असून एका समारंभात हे लग्न पार पडले.

शोएब मलिकचे याआधीचे लग्न टेनिस स्टार सानिया मिर्झासोबत झाले होते. पण गेल्या काही काळापासून दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्या येत होत्या.

दरम्यान, बुधवारीच (१७ जानेवारी) सानिया मिर्झाने एक रहस्यमय पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिचे आणि शोएब मलिक याच्यांतील नाते सध्या कसे आहे याबाबतच्या गोष्टी स्पष्टच लिहिल्या होत्या.

सानियाने पोस्टमध्ये लिहिले होते, की 'लग्न कठीण आहे. घटस्फोट घेणे कठीण आहे. तुम्ही तुमची कठीण गोष्ट निवडा. लठ्ठपणा कठीण आहे. फिट राहणे कठीण आहे. तुम्ही तुमची कठीण गोष्ट निवडा. कर्जात अडकणे कठीण आहे. आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध राहणे कठीण आहे. तुम्ही तुमची कठीण गोष्ट निवडा. संवाद अवघड आहे. संवाद करणे कठीण आहे. तुम्ही तुमची कठीण गोष्ट निवडा. जीवन कधीच सोपे असणार नाही. ते नेहमीच कठीण असेल. पण आपण आपली मेहनत निवडू शकतो."

सोबतच सानियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला होता, यात तिने हुशारीने निवडा, असे लिहिले होते.

सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी

सना जावेद ही शोएब मलिकची तिसरी पत्नी बनली आहे. सना जावेदच्या आधी शोएबने २०१० मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी दुसरे लग्न केले होते. तेव्हा शोएबची पहिली पत्नी आयशा सिद्दीकी पुढे आली होती. सानियासोबतच्या लग्नाच्या वेळी शोएब मलिकने त्याची पहिली पत्नी आयशासोबत कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचे नाकारले होते, परंतु हे प्रकरण पुढे गेल्यावर शोएबने आयशाला घटस्फोट दिला.

 सना जावेद कोण आहे?

शोएब मलिकची दुसरी पत्नी सना जावेद ही पाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. तिने २०२० मध्ये उमेर जसवालशी लग्न केले होते. मात्र, दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले. त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण समोर आले. २८ वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

 

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi