मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Shoaib Bashir : इंग्लंडचा 'पाकिस्तानी' खेळाडू शोएब बशीरला व्हिसा मिळाला, भारतात कधी पोहोचणार? जाणून घ्या

Shoaib Bashir : इंग्लंडचा 'पाकिस्तानी' खेळाडू शोएब बशीरला व्हिसा मिळाला, भारतात कधी पोहोचणार? जाणून घ्या

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 24, 2024 08:07 PM IST

Shoaib Bashir Received India Visa : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारतात आला आहे. पण शोएब बशीर हा संघासोबत भारतात आला नाही.

Shoaib Bashir
Shoaib Bashir

इंग्लंडचा खेळाडू शोएब बशीर याला भारताचा व्हिसा मिळाला आहे. या आठवड्याच्या शेवटी तो भारतात येईल आणि इंग्लिश संघात सामील होईल. व्हिसाच्या समस्येमुळे बशीरला अबुधाबीहून इंग्लंडला परतावे लागले, पण आता त्याला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळाला आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी इंग्लंडचा संघ भारतात आला आहे. पण शोएब बशीर हा संघासोबत भारतात आला नाही.

बेन स्टोक्सने नाराजी व्यक्त केली होती

शोएब बशीर पाकिस्तानी वंशाचा आहे. त्याला व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने हे निराशाजनक असल्याचे म्हटले आहे, तर ब्रिटिश सरकारच्या प्रवक्त्याने युवा खेळाडूबाबत अशी वागणूक योग्य नसल्याचे सांगितले. २० वर्षांचा ऑफस्पिनर बशीर इंग्लिश काउंटी संघ सॉमरसेटकडून खेळतो. तो अबुधाबीमध्ये संघासोबत होता पण व्हिसा न मिळाल्याने तो भारतात येऊ शकला नाही. यामुळे पाकिस्तानी वंशाच्या बशीरला नंतर इंग्लंडला परतावे लागले.

या आठवड्यात बशीर भारतात येईल 

इंग्लंडला परतल्यानंतर शोएब बशीरला भारताचा व्हिसा मिळाला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली. या आठवड्याच्या अखेरीस तो संघात सामील होईल. मात्र, भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात तो भाग घेऊ शकणार नाही. मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळवला जाणार आहे. बशीर त्या सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असेल.

इंग्लंड क्रिकेट बोर्ड काम म्हणाले?

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर ही माहिती दिली. या प्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे की, आता परिस्थिती निवळल्याने आम्हाला आनंद झाला आहे.

तर भारतीय परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्याने सांगितले, व्हिसा लंडनमधून जारी करण्यात आला आहे. भारतीय व्हिसा जारी करण्यासाठी नियम आणि कायदे आहेत. या प्रकरणातही तेच लागू केले जात होते.

शोएब बशीरचे क्रिकेट करिअर

शोएब बशीरने आतापर्यंत ६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने ६ लिस्ट ए आणि ५ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने प्रथम श्रेणीच्या १० डावात १० विकेट्स, लिस्ट-ए च्या ७ डावात ३ विकेट्स आणि T20 च्या ४ डावात ४ बळी घेतले आहेत.

WhatsApp channel
For latest Cricket News Live Score stay connected with HT Marathi