Viral Video : शोएब अख्तर आणि शाहीद कपूरची ग्रेट भेट, भज्जीच्या उपस्थितीत कसली चर्चा सुरूय?पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Viral Video : शोएब अख्तर आणि शाहीद कपूरची ग्रेट भेट, भज्जीच्या उपस्थितीत कसली चर्चा सुरूय?पाहा

Viral Video : शोएब अख्तर आणि शाहीद कपूरची ग्रेट भेट, भज्जीच्या उपस्थितीत कसली चर्चा सुरूय?पाहा

Jan 13, 2025 08:02 PM IST

Shoaib Akhtar Shahid Kapoor : शोएब अख्तर, शाहिद कपूर आणि हरभजन सिंग यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video : शोएब अख्तर आणि शाहीद कपूरची ग्रेट भेट, भज्जीच्या उपस्थितीत कसली चर्चा सुरूय?पाहा
Viral Video : शोएब अख्तर आणि शाहीद कपूरची ग्रेट भेट, भज्जीच्या उपस्थितीत कसली चर्चा सुरूय?पाहा

Harbhajan Singh Shoaib Akhtar Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, भारताचा ऑफस्पिनर हरभजन सिंग आणि बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर दिसत आहे.

हा व्हिडिओ एका विमानतळावरील असल्याचे दिसत आहे. पुढे या व्हिडिओमध्ये शाहिद कपूर आणि शोएब अख्तर यांच्यात दीर्घ संभाषण सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर जवळच हरभजन सिंग उभा आहे. तसेच, त्याठिकाणी चाहत्यांची मोठी गर्दी असल्याचेही दिसत आहे. शोएब अख्तर आणि शाहिद कपूर एका विशिष्ट विषयावर बोलत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल

शोएब अख्तर, शाहिद कपूर आणि हरभजन सिंग यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शोएब अख्तर आणि शाहिद कपूर कोणत्या विषयावर गप्पा मारत आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. पण तिघांचा हा व्हिडीओ मात्र, सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे आणि यूजर्स कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

शोएब अख्तरची क्रिकेट कारकीर्द

शोएब अख्तरने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये ४६ कसोटी, १६३ एकदिवसीय आणि १५ टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. कसोटी फॉरमॅटमध्ये शोएब अख्तरने ४५.७५ च्या स्ट्राईक रेटने आणि २५.७ च्या सरासरीने १७८ विकेट घेतल्या आहेत.

तर कसोटी सामन्यांमध्ये शोएब अख्तरने दोन्ही डावांत मिळून दोनदा १० बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. सोबतच त्याने १२ वेळा कसोटीत एका डावात ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे.

शोएब अख्तरने १६३ एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. या फॉरमॅटमध्ये शोएब अख्तरने ४.७७ च्या इकॉनॉमी आणि २४७ फलंदाजांना आपला बळी बनवले. याशिवाय शोएब अख्तरने पाकिस्तानसाठी १५ टी-20 सामन्यांमध्ये ८.१५ च्या इकॉनॉमी आणि १९ विकेट घेतल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या